येथील नवमहाराष्ट्र सहकारी सूत गिरणीचे चेअरमन, खाटीक समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दत्तात्रय इंगवले यांना इंटीग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगांवी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या वतीने ‘राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंटीग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगांवी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या वतीने दरवर्षी दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. चंद्रकांत इंगवले हे सातत्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. इचलकरंजी शहर व परिसर खाटीक समाजाचे ते ज्येष्ठ नेते आहेत. तर विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन इंटीग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगांवी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
बेळगांव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री विराप्पा मोइली, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, मलेशियातील उद्योगपती सीमा इंगरोळी, बेळगांवचे जिल्हा पोलिसप्रमुख महेश मेघण्णावर, बेळगांवचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, होमगार्ड डिपार्टमेंटचे जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, इजिप्त-मॅक्सिको सीईओ उद्योगपती एलिझाबेथ इस्लास लिऑन आदी मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा धर्मनाथ भवन येथे संपन्न झाला.