Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीमाणुसकी फाऊंडेशनमार्फत पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता

माणुसकी फाऊंडेशनमार्फत पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता

नांवाप्रमाणेच ‘माणुसकी’ जोपासत सदैव समाजकार्यात सदैव अग्रेसर असणार्‍या माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने इचलकरंजीची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता आणि नदीपात्र जलपर्णी मुक्तीसाठी मोहिम राबविण्यात आली. दरम्यान, ही मोहिम सुरु असतानाच एका व्यक्तीने पंचगंगा नदीपात्रात उडी मारल्याची माहिती मिळताच फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ती व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतदेह काढून त्याबाबतची माहिती पोलिसांना कळविली.

इचलकरंजीतील पंचगंगा नदीला पात्राला पुन्हा जलपर्णीचा विळखा पडला आहे. या जलपर्णीतून पंचगंगेला मोकळा श्‍वास मिळण्यासाठी माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविली. नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासह घाट परिसरात नागरिकांनी फेकलेला कचरा गोळा करुन त्याचे एकत्रीकरण केले. ही मोहिम सुरु असतानाच जुन्या पुलावरुन एका व्यक्तीने नदीपात्रात उडी मारल्याची माहिती फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांनी तातडीने नदीपात्रात उतरुन त्या व्यक्तीचा शोध घेतला. ती व्यक्ती मिळाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर तो मृतदेह पात्रातून काढून त्याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.

माणुसकी फाऊंडेशनच्या या उपक्रमास आयुक्तओमप्रकाश दिवटे यांनी भेट देत सामाजिक चळवळीबद्दल फाऊंडेशन कौतुक करत प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जावळे यांनीही इचलकरंजीतील सामाजिक प्रश्‍नासंदर्भात माणुसकी फाउंडेशनकडून आपलं गाव व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हवे ते सहकार्यप्रशासनाला करण्याची ग्वाही दिली.

मोहिमेत माणुसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जावळे, महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापनचे संजय कांबळे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, महापालिकेचे कर्मचारी व माणुसकी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -