टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना आयर्लंडविरुद्ध आहे. या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. कर्णधार रोहित शर्मा याचं तीन मोठ्या विक्रमावर नजर आहे. चला जाणून घेऊयात काय ते
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध आयर्लंड सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप खेळत आहे. यंदा जेतेपदासाठी टीम प्रबळ दावेदार मानला जात आहे. असं असताना रोहित शर्मा तीन विक्रमांच्या वेशीवर आहे.
रोहित शर्मा हा सर्वाधिक वेळा टी20 वर्ल्डकप खेळणारा खेळाडू आहे. 2007 वर्ल्डकप विजेत्या संघात रोहित शर्मा होता. त्यानंतर सलग 2024 पर्यंत वर्ल्डकप खेळत आहे.
रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध 64 धावा करताच 1000 धावांचा पल्ला गाठणार आहे. रोहित शर्माने टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत 39 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 936 धावा केल्या आहेत. जर यात यश मिळालं तर 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरेल.
रोहितला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 26 धावांची गरज आहे. विराट कोहली आणि बाबर आझमनंतर ही कामगिरी करणारा तिसरा खेळाडू ठरेल.
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ख्याती आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटने एकूण 597 षटकार मारले आहेत. रोहित आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात आणखी 3 षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 600 षटकार पूर्ण होतील.