लोकसभा निवडणुकीत भाजपला हक्काचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून मोठा फटका बसला आहे. यंदा राजस्थानमधून साथ मिळाली नाही. महाराष्ट्रातून जोरदार पिछेहाट झाली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. यामुळे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचे सर्व 543 जागांचे निकाल लागले आहे. निवडणूक आयोगाने सर्वच 543 लोकसभा मतदार संघातील निकाल जाहीर केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 240 जागा भाजपला मिळाल्या आहेत. काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा आता काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. परंतु काँग्रेसला सेंच्युरी गाठता आली नाही. त्यातच राहुल गांधी दोन मतदार संघातून विजयी झाल्यामुळे एक ठिकाणावरुन ते राजीनामा देणार आहेत. त्या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे. 2019 मध्ये भाजपला 303 तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या. आता भाजपला जोरदार फटका बसला आहे तर काँग्रेसने मुसंडी मारली आहे.
यामुळे भाजपचे नुकसान
लोकसभा निवडणुकीत भाजपला हक्काचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून मोठा फटका बसला आहे. यंदा राजस्थानमधून साथ मिळाली नाही. महाराष्ट्रातून जोरदार पिछेहाट झाली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. यामुळे भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहे त्याची माहिती
भाजप – 240
काँग्रेस – 99
समाजवादी पार्टी – 37
तृणमूल काँग्रेस – 29
डीएमके – 22
टीडीपी – 16
जेडी(यू) – 12
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 9
एनसीपी (शरद पवार)-8
शिवसेना – 7
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – 5
वायएसआरसीपी – 4
आरजेडी – 4
सीपीआय (एम) – 4
इंडियन युनियन मुस्लिम लीग – 3
आप – 3
झारखंड मुक्ती मोर्चा – 3
जनसेना पार्टी – 2
सीपीआय(एमएल)(एल) – 2
जेडी(एस) – 2
विदुथलाई चिरुथैगल काची (VCK) – 2
सीपीआय – 2
आरएलडी – 2
नॅशनल कॉन्फ्रेंस – 2
यूनाइटेड पीपुल्स पार्टी, लिबरल – 1
असम गण परिषद – 1
हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) – 1
केरळ काँग्रेस – 1
क्रांतिकारी समाजवादी पार्टी – 1
एनसीपी – 1
वॉयस ऑफ द पीपल पार्टी – 1
जोराम पीपुल्स मूवमेंट – 1
शिरोमणी अकाली दल – 1
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी – 1
भारत आदिवासी पार्टी – 1
सिक्किम क्रांतिकारी मोर्चा – 1
मरूमलार्ची द्रविड मुनेत्र कडगम – 1
आजाद समाज पार्टी (कांशीराम) – 1
अपना दल (सो आहे नीलाल) – 1
आजसू पार्टी – 1
एआयएमआयएम – 1
अपक्ष – 7