Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीदेवेंद्र फडणवीसांनी पराभव केला मान्य अन् घेतला धक्कादायक निर्णय; म्हणाले, मला मुक्त…

देवेंद्र फडणवीसांनी पराभव केला मान्य अन् घेतला धक्कादायक निर्णय; म्हणाले, मला मुक्त…

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या पराभवावर विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी भाजपचा पराभव कशाने झाला? त्याचे कारणे माध्यमांसमोर स्पष्टपणे सांगितली.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाहीतर फडणवीस यांनी असेही म्हटले की, नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली आहे. नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या पराभवावर विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी भाजपचा पराभव कशाने झाला? त्याचे कारणे माध्यमांसमोर स्पष्टपणे सांगितली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -