Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : विजेचा शॉक लागून शाळकरी मुलाचा मृत्यू : परिसरात हळहळ

इचलकरंजी : विजेचा शॉक लागून शाळकरी मुलाचा मृत्यू : परिसरात हळहळ

डिजीटल फलक लावताना उच्च दाब वाहिनीचा शॉक लागून एका शाळकरी मुलाचा मृत्यू तर अन्य एक युवक जखमी झाला. गुरुनाथ उर्फ वेदांत उत्तम मोहिते (वय १७, रा. तोरणानगर, शहापूर) असे मृताचे नाव आहे. तर जखमी झालेल्या युवकाचे नाव आशिष दीपक कांबळे (वय २७, तोरणानगर, शहापूर) असे आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. सदरचा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास यड्राव फाटा येथे घडला. या घटनेची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती की, गुरुनाथ मोहिते व आशिष कांबळे हे दोघे तोरणानगर भागात शेजारी राहतात. यड्राव फाटा येथील पेट्रोलपंपासमोर एका इमारतीत कांबळे याने कामासाठी दुकानगाळा भाड्याने घेतला आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आशिष याने शेजारील गुरुनाथ याला सोबत घेवून दुकानगाळ्यात आला. त्याला घेवून दुकानगाळ्याला फलक लावत होता. दोघांच्या हातातील लोखंडी फ्रेम असणारा हा फलक वाऱ्यामुळे हलला. दोघांना फलक सावरता आला नसल्यामुळे तो दोन फुटांवर असणाऱ्या उच्चदाब विद्युत वहिनीला चिटकला आणि दोघांना विजेचा जबर शॉक बसला. हातातून बोर्ड बाजूला फेकत दोघे खाली कोसळले. बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या दोघांना त्वरित नागरिकांनी उपचारासाठी हलवले. दोघांना सुरूवातीला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यातील गुरुनाथ मोहिते हा मयत झाला. तर आशिष कांबळे याची प्रकृती अस्थिर बनल्याने त्याला सांगली सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले. आयजीएम रुग्णालयात तोरणानगर भागातील नागरिक, दोघांचे मित्रमंडळी मोठ्या संख्येने जमले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -