Sunday, February 23, 2025
Homeनोकरीतरुणांसाठी EPFO मार्फत भरती प्रक्रिया सुरू; वाचा पात्रता आणि पगार किती ?

तरुणांसाठी EPFO मार्फत भरती प्रक्रिया सुरू; वाचा पात्रता आणि पगार किती ?

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी भरती समोर आली आहे. EPFO मध्ये काही पदांसाठी भरती होणार आहे. ‘सांख्यिकी’ सहाय्यक (Statistical Assistant) या पदासाठी भरती होणार असून यामध्ये फक्त एकच जागा शिल्लक आहे.

 

या भरतीविषयी सविस्तर माहिती पुढे सांगितली आहे.

 

EPFO स्टॅटिस्टिकल असिस्टंट पदासाठी भरती होत आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराला PB-02 फॉरमॅटमध्ये मासिक स्वरूपात कामाचा मोबदला म्हणजेच पगार दिला जाणार आहे.

 

पदाचे नाव आणि रिक्त जागा किती?

 

२०२४ च्या EPFO भरती अधिकृतसूचनेनुसार, सांख्यिकी सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये फक्त १ रिक्त जागा भरली जाणारे.

 

EPFO भरतीमध्ये यशस्वी उमेदवाराचे वेतन किती?

 

2024 च्या EPFO भरतीमध्ये निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना PB-2 मध्ये ९३०० रुपये – ३४८०० + रुपये GP ४२०० रुपये मिळतील

 

EPFO भरतीसाठी आवश्यक पात्रता

 

EPFO भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ‘सांख्यिकी’ विषयांपैकी एका विषयात पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. हेच उमेदवार या पदासाठी अपल्या करू शकतात.

 

EPFO भरतीसाठी अनुभव काय असावा?

 

२०२४ च्या EPFO भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान ३ वर्षांचा सांख्यिकीय कामाचा अनुभव असावा.

 

२०२४ च्या EPFO भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

 

२०२४ च्या EPFO भरती अधिकृतसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवरआधी भेट द्यावी. त्यानंतर तेथे अर्ज भरून नमूद केलेल्या पत्त्यावर सबमिट करून ऑफलाइन अर्ज भरावा. यासोबतच अर्जामध्ये नमूद केलेली कागदपत्रे जोडणे देखील अत्यंत आवश्यक आहे.

 

अर्ज भरण्याची अंतिम तारीख

 

अधिकृतसूचनेनुसार, ही सूचना ७ जून २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या तारखेपासून १५ दिवसांच्या आत तुम्ही हा अर्ज भरू शकता. म्हणजेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जून २०२४ आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -