Saturday, September 7, 2024
HomeBlogइचलकरंजीत बकरी ईद उत्साहात साजरी

इचलकरंजीत बकरी ईद उत्साहात साजरी

इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी सोमवारी पवित्र बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. यावेळी देशातील एकता व अखंडता कायम राहून दुष्काळासह सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवापठण करण्यात आले. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे , सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम समाजात रमजान ईद व बकरी ईद  मोठे व महत्वाचे सण मानला जातात. यादिवशी ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण केले जाते. मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते. यावेळी जवाहरनगर मस्जिदचे मुफ्ती युसूफ मोमीन यांनी बयान पठण तर नमाज व दुआ पठण चाँदतारा मस्जिदचे हाफिज इम्रान मुल्ला यांनी केले. हजरत सय्यद मखतूमवली दर्गा ट्रस्ट व इदगाह ट्रस्ट यांचेवतीने नियोजन करण्यात आले होते. बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -