Friday, October 18, 2024
Homeइचलकरंजीशिरदवाडच्या बरगाले हायस्कूलचा पट दुप्पटीने वाढवूया : गजानन कांबळे

शिरदवाडच्या बरगाले हायस्कूलचा पट दुप्पटीने वाढवूया : गजानन कांबळे

शिरदवाड/ ताजी बातमी टीम

आज रोजीचा शाळेचा जेवढा पट आहे याच्या दुप्पट पट पुढल्या वर्षी करू. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न आणि सहकार्य करू” असे आवाहन पर आश्वासन आयु. गजानन कांबळे सर यांनी दिले.

औचित्य होते ते शनिवार दि.१५/०६/२०२४ रोजी “सा विद्या या विमुक्तये” हे ब्रीदवाक्य असलेल्या “कल्पवृक्ष चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर” संचलित “डॉ. डी. एस. बरगाले हायस्कूल शिरदवाड” या प्रशालेच्या आठवीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ.

या प्रसंगी प्रमुख अतिथी शिरदवाड ग्रामपंचायत सदस्या आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा आयु. ज्योती गजानन कांबळे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, सॅक आणि गणवेश वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी आयु. ज्योती गजानन कांबळे मॅडम यांनी प्रशालेच्या १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रा. डॉ. अमर कांबळे सर लिखित “मुलाखत कौशल्य” आणि “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” ही पुस्तके देवून गौरव पर सत्कार केला.

प्रसंगी संस्थेचे संचालक महावीर बरगाले, माजी उपसरपंच भिमराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गजानन कांबळे सर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक / शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आडके सर आणि झुणके सर यांनी केले तर आभार पाटील मॅडम यांनी मानले.

दरम्यान या हायस्कूलमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या उपयोगी अनेक प्रयोगशील उपक्रम राबविले जातात. परिणामी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळत असल्याने पंचक्रोशीतून या हायस्कूल कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -