Monday, September 16, 2024
Homeतंत्रज्ञानजिओच्या ग्राहकांना मोठा फटका! रिचार्ज प्लॅनमध्ये केली 22 टक्क्यांनी वाढ

जिओच्या ग्राहकांना मोठा फटका! रिचार्ज प्लॅनमध्ये केली 22 टक्क्यांनी वाढ

सध्या भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. परंतु रिलायन्स जिओ या कंपनीशी अनेक ग्राहक जोडलेले आहेत. जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच आता जिओने त्यांच्या ग्राहकांना एक मोठा झटका दिलेला आहे. तो म्हणजे आता जिओनी त्यांचे सगळे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन महाग केलेले आहेत. जिओचा सगळ्यात स्वस्त प्लान हा 155 रुपयांना होता. तो आता त्यांनी 189 रुपयांना केलेला आहे. जिओने त्यांचे सगळे दर महिन्याचे, तीन महिने त्याचप्रमाणे वर्षभराचे रिचार्ज प्लान देखील वाढवलेले आहेत. त्यामुळे आता जिओच्या ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

तीन जुलै पासून नवीन दर चालू

रिलायन्स जिओनी नुकतेच त्यांच्या रिचार्जची किंमत वाढण्याची घोषणा केलेली आहे. त्यांनी त्यांचे सगळे डेटा प्लॅन हे महाग केलेले आहेत. आणि हे सगळे नवीन 3 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. जिओचा आतापर्यंत सगळ्यात स्वस्त प्लॅन हा 155 रुपयांना होता. तो त्यांनी आता वाढवून 189 रुपयांचा केलेला आहे. जिओने त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 22 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. जिओने त्यांचे 19 प्लॅन वाढवलेले आहेत. त्यातील 17 प्लॅन प्रीपेड आहेत, आणि उरलेले 2 हे पोस्टपेड प्लॅन आहेत.

जिओच्या प्लॅनचे बदललेले दर

जिओचा सगळ्यात स्वस्त प्लॅन हा 155 रुपयांना होता. परंतु आता 3 जुलैपासून हा प्लॅन हा 189 रुपयांना होणार आहे. याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असणार आहे. त्याचप्रमाणे 209 रुपयांच्या प्लॅनची किंमत त्यांनी आता 249 रुपये केलेली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 28 दिवसांची आहे. त्याचप्रमाणे 239 रुपयांचा प्लॅन हा अनलिमिटेड होता. ज्याची किंमत आता 299 रुपये करण्यात आलेली आहे.

जिओनी त्यांचे पोस्टपेड प्लॅन देखील महाग केलेले आहे. 30 जीबी डेटाचा प्लॅन हा 299 रुपयांना होता. परंतु आता त्याची किंमत 349 रुपये एवढी केलेली आहे. त्याचप्रमाणे 75 जीबी डेटाचा प्लॅन हा 399 होता. तो आता 449 रुपयांना केलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -