Sunday, September 8, 2024
Homeसांगली‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने संपवलं जीवन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा

‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने संपवलं जीवन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा

सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीमधील युवा पैलवान ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकम याने त्याचं आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सूरज याने शुक्रवारी संध्याकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, आयुष्य का संपवलं याचं कारण अद्याप स्प्ष्ट झालेले नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरजच्या अशा अकाली जाण्यामुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैलवान सूरज निकम हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील रहिवासी आहे. त्याने त्याच्या राहत्या घरातच गळफास लावून घेतला आणि आयुष्य संपवलं. पैलवान सूरज याने आत्महत्या का केली यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली होती.

कुस्ती क्षेत्रात शोककळा

कुस्तीपटू सूरज निकम हा एक नावंत, प्रसिद्ध कुस्तीपटू आहे. यापूर्वी त्याने कुस्ती क्षेत्रात अनेक विजेतेपदं, खिताब पटकावले आहेत. विरोधी कुस्तीपटूला पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. कुस्ती विश्वात अत्यंत कमी कालावधीत आपला दबदबा निर्माण करून कुमार केसरी होण्याचा मान त्याने मिळवला.

मात्र कुस्तीच्या क्षेत्रात, आखाड्यात अनेकांना लीलया लोळवणाऱ्या सूरज निकमने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सूरजच्या वडीलांचे आधीट निधन झाले होते. त्यामुळे तो व्यथित होता. सुरजच्या मृत्यूची बातमी समजताच कुस्ती क्षेत्रात शोककळा पसली.अनेकांनी त्याच्या अकाली मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली.

करिअरचा ग्राफ उंचावताना का उचललं टोकाचं पाऊल ?

सूरजच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. शनिवारी दुपारी त्याचे कुटुंबीय आल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावातील रहिवासी असलेल्या सूरज निकमने कुस्ती क्षेत्रात आपले नाव कोरले.

कुस्ती क्षेत्रात त्याने अनेक पैलवानांना पराभूत केले आहे. त्यामुळेच त्याला ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळाला. दरम्यान, त्याला कुस्ती क्षेत्रात अपेक्षित यश मिळत असताना आणि यशाचा आलेख उंचावत असताना त्याला आत्महत्या का करावी लागली? असा प्रश्न अनेकांना पडला असन पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -