Monday, September 16, 2024
Homeराजकीय घडामोडीमोठी बातमी! अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार, बडा नेता शरद पवार...

मोठी बातमी! अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार, बडा नेता शरद पवार यांच्या गळाला?

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. दुसरीकडे नेतेमंडळींना आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत. तर काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्षबदल करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा या परिस्थितीत कोल्हापुरातील राजकीय घडामोडींनीही वेग आला आहे. कोल्हापुरातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. येथील अजित पावर यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रादीत प्रवेश करण्याची दाट  शक्यता आहे. कोल्हापुरात तशा हालचाली सुरू आहेतमुंबई : लोकसभा निवडणूक 2024 संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. दुसरीकडे नेतेमंडळींना आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत. तर काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्षबदल करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा या परिस्थितीत कोल्हापुरातील राजकीय घडामोडींनीही वेग आला आहे. कोल्हापुरातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. येथील अजित पावर यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रादीत प्रवेश करण्याची दाट  शक्यता आहे. कोल्हापुरात तशा हालचाली सुरू आहेत.

ए वाय पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट

कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी अलिकडच्या काळात दोन वेळा कोल्हापूरचा दौरा केला. या दोन्ही दौऱ्यांत ए वाय वाटील यांचा सहभाग होता. ए वाय पाटलांच्या भेटीनंतर ते शरद पवार यांच्यासोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय.

के पी पाटील यांनीही घेतली शरद पवारांची भेट

तर दुसरीकडे ए वाय पाटील यांच्यानंतर माजी आमदार के पी पाटील यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीकडून लढण्यावर के पी पाटील हे ठाम आहेत. कोल्हापुरातील राधानगरी-भुदरगडची जागा कोणत्या पक्षाकडे जाते यावर के पी पाटील यांचा निर्णय अवलंबून असेल. के पी पाटील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा जाहीर करणार आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरच्या राजकारणात नेमके काय घडणार? शरद पवार यांचा राजकीय डावपेच यशस्वी ठरणार का? अजित पवार यांच्या पक्षाला खिंडार पडणार का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.

…म्हणजे भूमिका बदलली असं नाही

शरद पवार यांच्या भेटीनंतर के पी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आहे. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पक्षाला रामराम ठोकणार अशा काही गोष्टी नाहीत. शरद पवार महाराष्ट्रातील वंदनीय नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचं सहकार चळवळीमध्ये प्रंचड मोठं योगदान आहे. मी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे असा नेता कोल्हापुरात आल्यानंतर सदिच्छा भेट घेणं म्हणजे भूमिका बदलली असं नाही. मुळात माझी भूमिका अजून बदललेली नाही आणि मी कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असे के पी पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत जाण्याचं अजून ठरायचं आहे

लोकांच्या मतांनुसार विधानसभेबाबत निर्णय घेता येईल. लोकांच्या इच्छेप्रमाणे उद्याची सर्व भूमिका आम्ही घेऊ. महाविकास आघाडीत जाण्याचं अजून ठरायचं आहे. जनतेच्या कोर्टातून काय येतं ते बघावं लागेलं. लोकांची, कार्यकर्त्यांची मतं समाजावून घेवून आणि मतदारसंघातील समविचारी घटकांचा विचार घेऊन भूमिका जाहीर करणार आहे. …नेत्यांना भेटण्यासाठी बंधनं नसतात

शरद पवारांना भेटल्याबद्दल माझ्यावर कारवाई होण्याचा काही संबंध नाही. कारण नेत्यांना भेटण्यासाठी बंधनं नसतात. विधानसभा उमेदवारीबाबत आमदार आबिटकर यांनी दावा केला. तो त्यांचा प्रश्न आहे. ते सत्ताधारी पक्षात आहेत. पूर्वी एका पक्षात होते, नंतर दुसऱ्या पक्षात गेले, हा भाग त्यांचा आहे. पण मी विधानसभेच्या मैदानात उतरणारच आहे. जिल्ह्यातील नेतृत्वाची आमच्यावर माया आहे. ए. वाय. पाटलांनी काय करावं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ती मोठी माणसं आहेत. ते पक्षाचे प्रांत उपाध्यक्ष होते, असे के पी पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -