Sunday, February 23, 2025
Homeनोकरीमोठी बातमी! HDFC बँकेचे 'हे' नवे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार, वाचा...

मोठी बातमी! HDFC बँकेचे ‘हे’ नवे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार, वाचा तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार?

मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक एचडीएफसीने आपल्या क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांत बदल केला आहे. बदललेले हे नियम येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे आता एचडीएफसी बँकेच्या ग्रहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर बँकेचा नवा नियम नेमका काय आहे? हे जाणून घेऊ या…

एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांत बदल केल आहे. ज्यांच्याकडे या बँकेचे क्रेडिट कार्ड आहे, त्यांच्या खिशाला झळ बसू शकते.

थर्ड पार्टी अॅप वापरल्यास 1 टक्के चार्जेस

थर्ड पार्टी अॅपमधून रेंटल ट्रान्झिशन्स करायचे असतील तर आता प्रत्येक ट्रान्झिशन्सवर 1 टक्के जार्सेस द्यावे लागणार आहेत. उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास क्रेड, पे-टीएम, Cheq, मोबीकिवी, फ्रीचार्ज तसेच अन्य थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीने करेन्टल ट्रान्झिशन्स करायचे असतील तर ट्रान्झिशनच्या 1 टक्के फी द्यावी लागणार आहे. ही फी ट्रान्झिशननुसार 3000 रुपयांपर्यंत वाढू शकते.

शैक्षणिक ट्रान्झिशन्साठी 1 टक्के चार्जेस

थर्ड पार्टी अॅपवरून शैक्षणिक ट्रान्झिशन करण्यासाठी एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ट्रान्झिशनच्या 1 टक्के चार्जेस घेतले जाणार आहेत. हे जार्जेस क्रेड, पे-टीएम,  मोबीकिवी, फ्रिचार्ज या तसेच इतर अॅप्सवर लागू असतील. ही ट्रान्झिशन फी 3000 रुपयांपर्यंत वाढू शकते. शाळा किंवा कॉलेजच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा त्यांच्या पीओएस मशीनवर जाऊन एचडीएफसीच्या मदतीने ट्रान्झिसन्स केल्यावर कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत.

50 हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या यूटीलिटी बीलसाठी कन्झ्यूमर क्रेडिट कार्डचा वापर केल्यावर एक टक्का चर्जेस लागणार आहे. हे जार्सेज 3000 रुपयांपर्यंत वाढू शकतात. बिझनेस कार्डसाठी ही मर्यादा 75 हजार रुपये आहे. इन्सुरन्स ट्रान्झिशन्स हे यूटीलिटी ट्रान्झिशन्स ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे अशा ट्रान्झिशन्ससाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत.

फ्यूअल ट्रान्झिशन्सवर 1 टक्के चार्जेस

इंधन भरताना कन्झ्यूमर क्रेडिट कार्डच्या मदतीने 15000 पेक्षा अधिक रकमेचे ट्रान्झिशन केल्यास 1 टक्का चार्जेस आकारले जातील. हे जार्सेस 3000 रुपयांपर्यंत वाढू शकतात.

ईएमआय प्रोसेसिंग फी

तुमच्या क्रेडिट कार्डच्या बीलचे तुम्हाला ईएमआयमध्ये रुपांतर करायचे असेल तर त्यासाठी आता तुम्हाला 299 रुपयांपर्यंतची फी द्यावी लागणार आहे. यासह तुमचे आऊटस्टँडिंग अमाऊंट किती आहे यानुसार तुमच्याकडून आता लेट फी आकारली जाईल. ही लेट फी 100 ते 1300 रुपयांपर्यंत असू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -