Sunday, February 23, 2025
HomeनोकरीLIC ची जबरदस्त योजना!! एकदा गुंतवणूक केल्यास दरमहा मिळेल 12 हजार रूपये...

LIC ची जबरदस्त योजना!! एकदा गुंतवणूक केल्यास दरमहा मिळेल 12 हजार रूपये पेन्शन

भविष्यात आर्थिक फटका बसू नये आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक व्हावी, यासाठी अनेकजण एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. एलआयसी सुरक्षेतेचे हमी देखील देते आणि चांगला परतावा ही मिळतो. त्यामुळेच एलआयसीच्या योजना लोकप्रिय ठरत आहे. आज आम्ही एलआयसीच्या अशाच एका योजनेविषयी माहिती देणार आहोत. ही योजना तुम्हाला निवृत्त झाल्यानंतर दरमहा एक ठराविक रक्कम देईल. चला तर मग जाणून घेऊया योजनेची माहिती.

एलआयसीच्या इतर योजनांमध्ये सरल पेन्शन योजना एक महत्त्वपूर्ण योजना बनली आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर एलआयसी तुम्हाला आयुष्यभरासाठी पेन्शन देत राहते. पर्यंत ही योजना निवृत्तीनंतरच सर्वात फायदेशीर ठरू शकते. जर एखादा व्यक्ती खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात काम करत असेल आणि त्याने PF ची रक्कम आणि ग्रॅच्युईटीची रक्कम निवृत्तीपूर्वी गुंतवली तर आयुष्यभर त्याला दर महिन्याला या पेन्शनचा लाभ घेता येईल.

गुंतवणूकीसाठी वयोमर्यादेची अट

सरल पेन्शन योजनेविषयीची माहिती एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे, या योजनेत 40 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकत नाही. परंतु एखादया व्यक्तीला 40 ते 80 वर्षापर्यंत कधीही गुंतवणूक करता येऊ शकते. तसेच, या योजनेत कोणत्याही व्यक्तीला एकदा प्रीमियम भरल्यानंतर वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर ही पेन्शन घेता येऊ शकते.

महिना मिळेल 12000 रूपये

लक्षात घ्या की, या योजनेअंतर्गत एखादया 42 वर्षीय व्यक्तीने 30 लाख रुपयांची ॲन्युइटी खरेदी केल्यास त्याला दरमहा 12,388 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. खास म्हणजे, या योजनेत पॉलिसीधारकाला कर्जाची सुविधा ही दिली जात आहे. सरल योजनेअंतर्गत पॉलिसीधारक सहा महिन्यांनंतर कर्ज घेऊ शकतात. या योजनेत एकता व्यक्ती किंवा पती-पत्नी सोबत देखील गुंतवणूक करू शकतात. अशा अनेक विविध कारणांमुळे ही योजना सर्वात फायदेशीर ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -