Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्यसाप्ताहिक राशिभिष्य: 1 जुलै ते 6 जुलै 

साप्ताहिक राशिभिष्य: 1 जुलै ते 6 जुलै 

1जूलै ते 6जुलै २०२४ )

मेष : अनुकूलता वाढेल

 

सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत. चांगल्या गोष्टींची अनुकूलता वाढेल. अमावास्या पराक्रम स्थानातून होत आहे. कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज भासणार नाही. कारण ज्या गोष्टीचा श्री गणेशा होत नव्हता तो या सप्ताहात होणार आहे. सध्या इतरांची मदत वेळेत मिळेल. प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागत होता, तो आता करावा लागणार नाही. त्यामुळे काम करताना कोणताही आळस वाटणार नाही. कामातील उत्साह वाढेल. व्यवसायात जाहिरात माध्यमातून बराच मोठा फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक बाबतीत सफलता मिळेल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

शुभ दिनांक : ३०, १

 

महिलांसाठी : श्रमाचे फळ मिळेल.

 

taurus

वृषभ

( 1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

वृषभ : खर्च जपून करा

 

दिनांक ३०, १ हे दोन दिवस २ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’ अशी गत होऊन बसणार आहे. म्हणजे आपल्या वैयक्तिक गोष्टी कोणासमोर मांडून चालणार नाही. कोणतेही महत्त्वाचे काम करताना दूरदृष्टीपणा ठेवा. स्वत:ची जबाबदारी इतरांवर टाकू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते. वादविवाद टाळा. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. समोरच्याने एखादा सल्ला दिला तर तो ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. अमावास्या धनस्थानातून होत आहे. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्या. खर्च जपून करा. जोडीदाराची साथ मिळेल.

 

योग साधनेला महत्त्व द्या.

 

शुभ दिनांक : ३, ६

 

महिलांसाठी : ठरवलेले ध्येय पूर्ण करा.

 

gemini

मिथुन1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

मिथुन : नियम चौकटीत राहा

 

दिनांक २, ३ व ४ असे हे तीन दिवस सतर्क राहून काम करा. घाईगडबडीने केलेली कोणतीही गोष्ट अंगलट येऊ शकते. त्यामुळे विचार करूनच निर्णय घ्यावे लागतील. तसेच इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. ‘आपले काम भले नि आपण भले’ असेच वातावरण ठेवा. समोरच्याने हिनवण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे दुर्लक्ष करा. कारण सध्याचे दिवस अनुकूल नाही. कायदेशीर गोष्टींचे पालन करा. नियमांच्या चौकटीत राहा. इतरांचा सल्ला घेताना तो कितपत योग्य आहे याची शहानिशा करा. बाकी दिवस ठीक राहतील. अमावास्या तुमच्या राशीतूनच होत आहे. व्यवसायात नको तो व्याप वाढवू नका. नोकरदार वर्गाने कामातील त्रुटी वेळीच दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करा. खर्च सांभाळा. कुटुंबाची काळजी घ्या. स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्या.

 

शुभ दिनांक : ३०, ६

 

महिलांसाठी : शब्दांची धार कमी करा.

 

Cancer

कर्क

(1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

कर्क : तोंडी व्यवहार टाळा

 

४ तारखेला दुपारनंतर दिनांक ५ व ६ असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा घालवता येईल ते पाहा. कोणत्याही कामाचे नियोजन केल्याशिवाय ते काम करू नका. नाहीतर ज्यादा कामाचा व्याप वाढेल. वेळेचे बंधन पाळा. जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी घाई करून काम करायचे ठरवल्यास ते काम लांबणीवर जाईल, तेव्हा धीर धरा. कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा. भावनिक गोष्टींच्या आहारी जाऊ नका. आळशी वृत्ती बाजूला ठेवा. अमावास्या तुमच्या व्ययस्थानातून होत आहे. हा कालावधी शांततेत पार पाडा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात तोंडी व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे काम ताबडतोब करून द्यावे लागेल. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना. मित्र-मैत्रिणींशी सलोखा वाढेल. मुलांसाठी वेळ द्याल. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्य जपा.

 

शुभ दिनांक : २, ३

 

महिलांसाठी : गोड बोलून कार्य साधा.

 

leo

सिंह

( 1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

सिंह : उत्कर्ष होईल

 

भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे चंद्र ग्रहाचे भ्रमण सुखकर असेल. कामे अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे होत राहतील. त्यामुळे कोणत्याही कामाचा कंटाळा येणार नाही. प्रत्येक कामात उत्साह वाटेल. इतरांनी मदत करावी ही अपेक्षा तुमच्या मनामध्ये येणार नाही. स्वत:चे काम स्वत: पूर्ण करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये राहील आणि ती तुम्ही पूर्ण कराल. चांगल्या कामाचा श्री गणेशा होईल. अमावास्या लाभस्थानातून होत आहे. व्यवसायात देवाण-घेवाण उत्तम राहील. नोकरदार वर्गाचा कामाच्या ठिकाणी उत्कर्ष होईल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. मित्र-मैत्रिणींसोबत करमणूक होईल. संतती प्राप्त होईल. घरगुती वातावरण आनंदी असेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

शुभ दिनांक : ३०, ६

 

महिलांसाठी : तुमचे बोलणे इतरांना आकर्षित करणार असेल.

 

gemini

कन्या

( 1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

कन्या : कुटुंबाची काळजी घ्या

 

दिनांक ३०, १ हे संपूर्ण दोन दिवस व २ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी तुम्हाला अस्वस्थ करणारा असेल. मात्र या कालावधीत शांत डोके ठेवून काम केल्यास त्रास होणार नाही. प्रत्येक गोष्टीत घाई करून चालणार नाही. जे तुम्हाला साध्य करायचे आहे ते करण्यासाठी न जमणाऱ्या गोष्टींच्या मागे लागू नका. वेळ आणि संधी मिळाली की सर्व गोष्टी होतात. सध्या ही वेळ नाही असे समजा. अमावास्या कालावधीत निर्णय घेताना ज्येष्ठांची मदत घ्या. बाकी दिवस चांगले असतील. सध्या व्यवसायात कोणतेही नवीन बदल करू नका. भांडवलाचा योग्य त्या ठिकाणी वापर करा. नोकरदार वर्गाचा कामासाठी वेळ जाईल. आर्थिक लाभ होईल. भावंडांची मदत मिळेल. कुटुंबाची काळजी घ्या. आहार सांभाळा.

 

शुभ दिनांक : ३, ४

 

महिलांसाठी : मेहनत वाढवावी लागेल.

 

libra

तूळ

(1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

तूळ : प्रकृती सांभाळा

 

दिनांक २, ३ आणि ४ अशा या तीन दिवसांत कोणतेही काम करताना एक घाव दोन तुकडे असे करून चालणार नाही. का? तर सध्या वातावरण चढ-उताराचे आहे असे म्हणायला हरकत नाही. शांत राहून कामे करावी लागतील. कोणी काय करावे आणि कोणी काय करू नये याचा सल्ला या दिवसांत कोणालाच देऊ नका. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. नाण्याच्या दोन बाजू असतात ही गोष्ट प्रथमत: लक्षात घ्या. जबाबदारीने वागल्यास त्रास होणार नाही. अमावास्या कालावधी चांगला जाईल. बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायात पळापळ करणे टाळा. नोकरदार वर्गाला नियमांचे पालन करावे लागेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. मानसिकता जपा. प्रकृती सांभाळा.

 

शुभ दिनांक : १, ६

 

महिलांसाठी : वारंवार निर्णय बदलणे टाळा.

 

soc

वृश्‍चिक

( 1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

वृश्चिक : संयम ठेवा

 

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा. ज्यावेळी चांगल्या दुधात मिठाचा खडा पडतो त्यावेळी दूध खराब होते तसेच हे ग्रहमान आहे असे समजा. म्हणजे कोणत्या वेळी काय बोलायचे कोणत्या वेळी काय बोलू नये याचा समज तुम्हाला या कालावधीत राहणार नाही. त्यामुळे तुम्ही स्पष्ट भूमिका घ्याल. यामुळे चांगली असलेली परिस्थितीसुद्धा बिघडू शकते. त्यापेक्षा डोक्यावर बर्फ तोंडात खडीसाखर असे सूत्र सध्या लक्षात ठेवावे लागेल, तरच दिवस चांगले जातील. व्यवसायात फायदा कमी झाला तरी चालेल, पण नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार वर्गाने सध्या धाडसाचे निर्णय घेणे योग्य राहणार नाही. आर्थिक चणचण भासेल. कुटुंबाशी बोलताना संयम ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या.

 

शुभ दिनांक : ३, ४

 

महिलांसाठी : कोणाच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष देऊ नका.

 

Sagi

धनु

(1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

धनू : चर्चेत सहभागी होऊ नका

 

दिनांक २, ३ आणि ४ असे हे तीन दिवस काळजीपूर्वक हाताळावे लागतील. अशा या कालावधीत नेमक्या अशा घटना घडतात की तुम्हाला त्या पटणाऱ्या नसतात. त्यावेळी तुमच्या रागाचा पारा चढतो व त्यावेळी तुम्ही काय बोलता आणि काय बोलत नाही हे तुम्हाला कळतच नाही. याचा सर्वात जास्त त्रास तुम्हाला होतो, त्यामुळे हे तीन दिवस अळीमिळी गुपचिळी असे वातावरण ठेवा. म्हणजे त्रासच होणार नाही बोलताना नियंत्रण सोडू नका. शिवाय कोणाच्या चर्चासत्रातही पडू नका. अमावास्या कालावधी ठीक राहील. बाकी दिवस ही ठीक असतील. व्यवसायात चालढकल करणे टाळा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या.

 

उधारीचे व्यवहार टाळा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. घरातले वातावरण चांगले ठेवा.

 

प्रकृतीची काळजी घ्या.

 

शुभ दिनांक : ३०, १

 

महिलांसाठी : आपलेच खरे करत बसू नका.

 

capri

मकर

( 1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

मकर : अंदाजे कृती टाळा

 

४ तारखेला दुपारनंतर ५ व ६ संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी चढउतारांचा राहणार आहे. या कालावधीत सहनशीलता वाढवा- जी आणि जशी परिस्थिती आहे तशी स्वीकारण्याचा प्रयत्न करा. कारण नसताना कोणत्याही गोष्टीचा वाद वाढवू नका. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. अंदाजे कृती करणे टाळा. इतरांना सल्ला न दिलेलाच चांगला. अमावास्या कालावधीत शांतता राखा. व्यवसायातील जबाबदारी दुसऱ्यांवर टाकू नका. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालेल. आर्थिक नियोजन पक्के करा.

 

राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करताना मागील अनुभव विसरू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. मानसिक ताण-तणाव घेऊ नका. योग साधनेला महत्त्व द्या.

 

शुभ दिनांक : २, ३

 

महिलांसाठी : नियम सोडून वागू नका.

 

Aqua

कुंभ

( 1 जुलै ते ६ जुलै २०२४ )

कुंभ : सहकार्य मिळेल

 

सध्या सप्ताहातील सर्वच दिवस चांगले आहेत. कोणत्याही दिवसांत काळजी करण्याची गरज नाही. सर्व अगदी सुरळीत चाललेले दिसून येईल. त्यामुळे मनामध्ये वारंवार जो नकारात्मक विचार येत होता तोही आता येणार नाही. त्यामुळे काम करायला ही उत्साह वाटेल. ज्यावेळी तुम्हाला इतरांच्या मदतीची गरज भासेल त्यावेळी ती मदत वेळेत मिळेल. अडचणीचा कालावधी कमी होईल. सध्या मात्र ताणतणावाचे वातावरणच निर्माण होणार नाही असे ग्रहमान आहे. अमावास्या तुमच्या भाग्यस्थानातून होत आहे. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींशी करमणूक होईल. संतती सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

शुभ दिनांक : १, ६

 

महिलांसाठी : स्वत:चे अस्तित्व स्वत: निर्माण कराल.

 

pices

मीन

( 1जुलै ते ६ जुलै २०२४ )

मीन : आर्थिक लाभ होईल

 

शुभ ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. सध्या सर्व दिवस चांगले असतील. प्रत्येक वेळी होणारा संघर्ष सध्या जाणवणार नाही. सकारात्मक गोष्टी घडतील घाईगडबड करून कोणतेही काम करण्याची सध्या तरी गरज नाही. सध्या तुम्ही जे ठरवणार आहात त्याप्रमाणेच काम होत राहील. तेव्हा इतरांचे मार्गदर्शनही चांगले मिळेल. आतापर्यंत तुमच्या मनामध्ये जी धरसोड वृत्ती होती तीसुद्धा कमी होईल. चांगल्या कामाला सुरुवात करण्याचा मार्ग सापडेल. अमावास्या कालावधी चांगला जाईल. व्यवसायातील परिस्थिती उत्तम राहील. नोकरदार वर्गाला पर्यायी गोष्ट स्वीकारणे योग्य राहील. आर्थिक लाभ होईल. सार्वजनिक क्षेत्रात सामूहिक गोष्टींची आवड राहील. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. धार्मिक गोष्टींना भेट द्या. प्रकृती ठणठणीत राहील.

 

शुभ दिनांक : ३०, १

 

महिलांसाठी : नवीन कला अवगत कराल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -