Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रपावसाळ्यात प्या गरमागरम काळ्या हरभऱ्याचे सूप; पटकन नोट करा साहित्य अन् कृती

पावसाळ्यात प्या गरमागरम काळ्या हरभऱ्याचे सूप; पटकन नोट करा साहित्य अन् कृती

पावसाळ्याच्या दिवसात सतत काहीतरी गरमागरम खावसं वाटतं. बऱ्याचदा आपण कांदा भजी, बटाटा वडा आणि चहाचा आस्वाद घेतो. पण, प्रत्येकवेळी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही टेस्टी आणि हेल्दी सूपचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळ्या हरभऱ्याचे सूप कसे बनवायचे हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…

काळ्या हरभऱ्याचे सूप बनवण्यासाठी साहित्य:

१. २ कप काळे हरभरे उकडलेले२. ३ कप काळ्या हरभऱ्याचे पाणी३. दीड कप चिरलेले सोयाबीन४. १ चमचा जिरे पूड५. ४-५ पाकळ्या चिरलेला लसूण६. १ आले बारीक चिरलेले७. १ कप चिरलेले गाजर८. १ कप चिरलेला टोमॅटो९. चिमूटभर लाल तिखट१०. चवीनुसार मीठ११. २ चमचे तेल

काळ्या हरभऱ्याचे सूप बनवण्याची कृती:

१. सर्वप्रथम एका गरम पातेल्यात तेल ओतून लसूण घालून फोडणी द्या व त्यानंतर त्यात आलं घाला.

२. आता टोमॅटो सोडून सर्व भाज्या घाला व सर्व मसाले घालून हे मिश्रण परता.

३. यावेळी गॅस मंद आचेवर ठेवा.

४. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून काळा हरभरा आणि त्याचे पाणी घाला.

5. आता हे मिश्रण पाच मिनिटे शिजवा.

६. तयार गरमागरम सूपचा आस्वाद घ्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -