Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रपुढील काही तास धोक्याचे! ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह होणार अतिमुसळधार पाऊस

पुढील काही तास धोक्याचे! ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह होणार अतिमुसळधार पाऊस

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच वेग घेतलेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. हवामान विभाग देखील रोजच्या पावसाचा (Weather Update) अंदाज व्यक्त करत आहे. अशातच आजचा म्हणजेच 7 जुलै 2024 रोजी हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तो आता आपण जाणून घेणार आहोत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण असणार आह, तर काही ठिकाणांना मात्र पावसाचा हाय अलर्ट जारी केलेला आहे.

 

आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर बोलायला गेले, तर आज या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. तर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. येथील कमाल तापमान 33 ° सेल्सिअस किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.

 

आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक तर अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची देखील शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये घाट भागात देखील अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आज ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे या विभागांना येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.

 

 

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट वादळ वारा यांच्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग असणार आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

 

त्याचप्रमाणे पुणे, जळगाव, धुळे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये घाट भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गोंदीया, चंद्रपूर, बुलढाणा, जालना, भंडारा, नांदेड, अमरावती, लातूर, धाराशिव, अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वारा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -