Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : व्यापारी पतसंस्थेच्या सांगली रोड वर्धापन दिन उत्साह

इचलकरंजी : व्यापारी पतसंस्थेच्या सांगली रोड वर्धापन दिन उत्साह

इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेच्या सांगली रोड शाखेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या दिमाखात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापुजा आयोजित केली होती. सदर प्रसंगी संस्थेस शुभेच्छा देणेसाठी वडगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्य पत संस्था फेडरेशनचे संचालक जवाहर छाबडा, बालाजी पत संस्थेचे चेअरमन मदन कारंडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाबासो पाटील (वखारवाले), नंदु पाटील, राजेंद्र बचाटे, शामराव कुलकर्णी, मनु हिराणी, बंडोपंत लाड, इचलकरंजी मर्चटस बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, व्हा. चेअरमन गजानन लोंढे, संचालक चंद्रकांत बिंदगे, इरगोंडा पाटील, राजेंद्र शिरगुप्पे, दशरथ मोहिते, विजय कामत, तसेच संस्थेचे सभासद, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक  विलास गाताडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
संस्थेचे चेअरमन सुर्यकांत साखरे यांनी संस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री दिलीप वणकुद्रे, बाळासो बरगाले, सुभाष तोडकर, विलास चव्हाण, सुभाष पाटील, शशिकांत शेटके, आशिष पाटील, नकुल झेले संचालिका सौ. भारती शिंदे, सौ. सुवर्णा म्हेतर, तज्ञ संचालक धन्यकुमार पाटील, विलास कोरवी, अमर सडगर, शाखा सल्लागार सागर मुसळे तसेच कर्मचारी वर्ग, पिग्मी एजंट उपस्थित होते. शेवटी आभार व्हा. चेअरमन संजय वठारे यांनी मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -