Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रआई वडिलांनी मुलासह सुनेचा खून केला, कापडाने बांधून विहिरीत लोटले.., अहमदनगरमधील ‘त्या’...

आई वडिलांनी मुलासह सुनेचा खून केला, कापडाने बांधून विहिरीत लोटले.., अहमदनगरमधील ‘त्या’ मृतदेहांचा उलगडा..

अकोला तालुक्यातील खिरविरे येथे विहिरीत मृतदेह सापडलेल्या बहिरू डगळे व सारिका या पती-पत्नीचा वडील व सावत्र आईने इतरांच्या मदतीने खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. एकमेकांना घट्ट मिठी मारून विहिरीत पाण्यात तरंगताना हे मृतदेह सापडले होते.

 

अकोला तालुक्यातील खिरविरे येथे विहिरीत मृतदेह सापडलेल्या बहिरू डगळे व सारिका या पती-पत्नीचा वडील व सावत्र आईने इतरांच्या मदतीने खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. एकमेकांना घट्ट मिठी मारून विहिरीत पाण्यात तरंगताना हे मृतदेह सापडले होते.

 

या दोघांच्या कमरेला एकाच कपड्याने बांधून त्यांना विहिरीमध्ये ढकलून दिल्याच्या फिर्यादीवरून बहिरू याचे वडील काळू काशिनाथ डगळे व सावत्रआई हिराबाई काळू डगळे यांच्यासह चार जणावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि.१ जुलै २०२४ रोजी हे जोडपे हरवल्याची तक्रार अकोले पोलिसांत दाखल होती.

 

गुरुवारी तीन दिवसांनी डगळे यांच्या घराजवळच्या विहिरीतच दोघांचे एकमेकांना घट्ट मिठीने आवळू हात व कंबर कपड्यांनी बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मयत बहिरू याचा पाडोशी येथील मामा एकनाथ कुलाळ व नातेवाईक यांनी जमीन प्रॉपर्टीसाठी घातपात केल्याचा आरोप केला होता.

 

कुलाळे यांच्या फिर्यादीनुसार काळू काशीनाथ डगळे, हिराबाई काळू डगळे, संतोष काशीनाथ डगळे आणि काशीनाथ लक्ष्मण डगळे (सर्व रा. खिरविरे, ता. अकोले) अशा चौघांवर अकोले पोलिसांनी दोघांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

शरीरावर जखमा कशा?

पोलिस तपासात बाप आणि सावत्र आईने मुलगा आणि सुनेची नियोजनपूर्वक हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा हक्कदार होऊ नये म्हणून हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.

 

हा घातपात नसून आत्महत्या आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मयत दोघांनी एकमेकांना घट्ट बांधले कसे?, मयताच्या शरीरावरील जखमा, जमीन वादातून बाप लेकांचे होणारे वाद यासह काही कारणे ही संशयास्पद होती.

 

त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात आहे. अशा प्रकारचे आरोप मुलाचे मामा एकनाथ कुलाळे यांनी केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -