आपल्यापैकी अनेकांच्या डोक्यावर केसांमध्ये दोन भोवरे असतात. व्यक्तीपरत्वे काहींना एक किंवा दोन किंवा अधिकही भोवरे असू शकतात. दोन भोवरे असणे ही बाब आपण सर्वसामान्य मानतो, परंतु सामुद्रिक शास्त्रात त्याची अनेक रहस्ये उघड केली आहेत. ज्योतिषी पंडित आलोक पंड्या यांच्याकडून याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
डोक्यावरील भोवऱ्याचे रहस्य –
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या डोक्यावर केसांचे भोवरे असतात ते अतिशय दयाळू स्वभावाचे असतात. असे मानले जाते की, अशा लोकांचे मन देखील खूप शांत असते. हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही रागावत नाहीत. याशिवाय अशा लोकांचे जीवनही खूप आनंदी असते.
डोक्यावर एक भोवरा असलेले लोक –
डोक्यावर एक भोवरा असणाऱ्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा दिसून येतो, असे सामुद्रिशास्त्रात सांगितले आहे. हे लोक सत्याचे मित्र असतात आणि क्वचितच खोटे बोलतात. प्रामाणिक असण्याव्यतिरिक्त, हे लोक एकनिष्ठ मानले जातात आणि ते नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात.
डोक्यावर दोन भोवरे असणारे लोक –
जर कोणाच्या डोक्यावर दोन भोवरे असतील तर अशा लोकांना सामुद्रिक शास्त्रात चांगले मानले जात नाही. हे लोक हट्टी स्वभावाचे असू शकतात आणि प्रत्येक गोष्टीवर रागावतात. यामुळे यांचे नाते कुणाशी फार काळ टिकत नाही. असे लोक लहानपणीही खूप खोडकर असतात. तथापि, त्यांना चांगल्या सवयी लावल्या जाऊ शकतात.