देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन २३ जुलै रोजी मोदी सरकारचं पहिलं अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाते निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकरी, कर्मचारी वर्ग आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेण्याची शक्यता आहे.यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे.
मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या योजनेची रक्कम ६००० रुपयांवरुन ८००० रुपये करावी, अशी मागणी होत आहे. सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातात. यात हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जाते.
एप्रिल महिन्यात झालेल्या चर्चेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शेतकऱ्यांच्या व्यापती वाढवण्यावर वाढ दिला आहे. सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेवर विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. या योजनेत मिळणारी रक्कम वाढवावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे सरकार ही रक्कम ६००० रुपयांवरुन ८००० रुपये करण्याच्या विचारात आहे, असं सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी केला होता होता. १७ व्या टप्प्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपये रक्कम जमा करण्याच आली होती.