Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगमध्यरात्री 3 वाजता भर पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीज पुरवठा केला सुरळीत

मध्यरात्री 3 वाजता भर पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीज पुरवठा केला सुरळीत

ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला म्हणजे पुन्हा सुरु होणे एक मोठे दिव्यच असते. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर महावितरण कंपनीचे वायरमन यांचा शोध सुरु होतो. महावितरणच्या कार्यालयात फोन केले जातात. त्यानंतर अनेकदा दखल घेतली जात नाही. यामुळे तासनतास अंधारात ग्रामीण जनतेला राहावे लागते. काही ठिकाणी वायरमन येत नसल्यामुळे इलेक्ट्रीकचे काम करणारे इतर नागरिकांकडून गेला फ्यूज दुरुस्त केला जातो. या सर्व अनुभवांच्या पार्श्वभूमीवर एक आश्चर्य निर्माण करणारी घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. अंधारात मोबाईल टॉर्चचा साहाय्याने मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास जीवावर उदार होत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने वीज पुरवठा सुरुळीत केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

असा सुरु केला वीज पुरवठा

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. सिद्धू आंधळे या वीज कर्मचाऱ्याने जीवावर उदार होऊ मध्यरात्री तीन वाजता वीज पुरवठा सुरळीत सुरु केला आहे. मध्यरात्री पाऊस सुरु होता आणि गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मग सिद्धू आंधळे यांनी रेनेकोट परिधान करुन हातात बॅटरी घेऊन मोर्चा वीज खाबाकडे वळवला. भर पावसात कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढत झाडावर चढून वीज पुरवठा सुरळीत केला. सिद्धू आंधळे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या कामाचे कौतूक होत आहे.

इतरांना मार्गदर्शक ठरणारे काम

वादळ आणि पाऊस आला म्हणजे वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार अनेकवेळा घडतो. त्यावेळी तो सुरुळीत करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात फोन करणाऱ्यांना ग्राहकांनी वेगवेगळे अनुभव येतात.

 

कधी फोन उचलले जात नाही, कधी फोन उचलले तर पाऊस थांबवल्यावर कर्मचारी जातील, कधी मोठा फॉल्ट झाला आहे, दुरुस्त होण्यास बराच वेळ लागले, अशी उत्तरे दिले जातात. परंतु आता इगतपुरी तालुक्यातील सिद्धू आंधळे यांनी केलेली कामगिरी महावितरणच्या इतर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -