Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगआषाढीसाठी पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची बस दरीत पडली, पाच भाविकांचा मृत्यू

आषाढीसाठी पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची बस दरीत पडली, पाच भाविकांचा मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली.

असा झाला अपघात

अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात झाला. एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मृतांची संख्या वाढली

भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका जणाचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -