Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगआता कुठेही घ्या सोने, देशभरात असणार सारखा दर, काय आहे नवीन धोरण?

आता कुठेही घ्या सोने, देशभरात असणार सारखा दर, काय आहे नवीन धोरण?

सोन्याचे दर देशभरात सारखे नसतात. राज्यानुसार नाही तर शहरानुसार सोन्याचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहकांची पंचाईत होत असते. परंतु आता सोने घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच देशात सर्वत्र सोन्याचे दर एकसारखे असणार आहे. यासंदर्भात ‘वन नेशन-वन रेट पॅालिसी’ (ONOR) लागू करण्यात येणार आहे. जेम अँड ज्वेलरी काउंसिलकडून ‘वन नेशन-वन रेट पॅालिसी’ लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. जेम अँड ज्वेलरी काउंसिल देशभरातील सराफांची मते यासाठी जाणून घेतली. सर्वांनी त्यासाठी सहमती दर्शवली. परंतु अद्याप सरकारकडून यासंदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. येत्या सप्टेंबर महिन्यापासून ‘वन नेशन-वन रेट पॅालिसी’ देशभरात सुरु होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला. या धोरणामुळे सोनेही स्वस्त होणार आहे.

काय आहे ‘वन नेशन-वन रेट पॅालिसी’?

‘वन नेशन-वन रेट पॅालिसी’ ही भारत सरकारची प्रस्तावित योजना आहे. देशभरात सर्वत्र सोन्याचे दर समान असावे, यासाठी ही लागू करण्यात येणार आहे. देशातील कोणत्याही शहरात सोने विकत घेतल्यास त्याचे दर सारखे असणार आहे. या योजनेसाठी सरकार राष्ट्रीय बुलियन एक्सचेंज तयार करणार आहे. हा एक्सचेंज सोन्याचे दर निश्चित करणार आहे. त्यानंतर ज्वेलर्स त्याच किंमतीत सोने विकणार आहे.

‘वन नेशन-वन रेट पॅालिसी’चे फायदे काय?

‘वन नेशन-वन रेट पॅालिसी’ची अनेक फायदे आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील पारदर्शकता वाढणार आहे. सर्व ग्राहकांसोबत सारखा व्यवहार होणार आहे. किंमतीमधील फरक संपणार आहे. एक सारख्या किंमतीमुळे मनासारखे दर कोणत्याही सराफाला लावता येणार नाहीत. तसेच देशभरातील सर्व ज्वेलर्सला स्पर्धेसाठी समान संधी मिळणार आहे.

जेम अँड ज्वेलरी काउंसिलकडून देशभरातील सराफांसोबत चर्चा करण्यात आली आहे. त्यावर एकमत झाले आहे. यामुळे आता सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या वैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. ही धोरणामुळे सोने बाजारात आधिक पारदर्शकता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -