महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. हवामान विभागाकडून देखील रोज पावसाबाबतचे अंदाज येत आहेत. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 16 जुलै रोजी हा पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने (Weather Update Update) दिलेल्या माहितीनुसार आज राज्यांमध्ये जवळपास 9 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केलेला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असल्यास घराबाहेर पडा, असे देखील सांगण्यात आलेले आहे.
आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आहे. त्यामुळे हवामान विभागाने (Weather Update) या जिल्ह्याला रेड अलर्ट देखील जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मध्यमहाराष्ट्रातील घाट भागात देखील तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील येऊ शकतो. या ठिकाणी वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलो प्रतितास एवढा असणार आहे.
त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या ठिकाणांना येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.