Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार 7000 पोलिसांची भरती

महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार 7000 पोलिसांची भरती

2023 मध्ये राज्यांमध्ये पोलीस भरती झालेली नाही. त्यामुळे आता राज्यामध्ये 2023 मध्ये रिक्त असलेल्या 17471 पोलीस भरतीची सुरुवात झालेली आहे. 1 सप्टेंबर पूर्वी ही भरती पूर्ण होणार आहे त्यामुळे आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळात 7 हजार पोलिसांची भरती होईल. अशी माहिती देखील गृह विभागाकडून देण्यात आलेली आहे.

 

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत जवळपास 2 वेळा ही पोलीस भरती (Police Bharti 2024) झालेली आहे. शहरात वाढत असलेली गुन्हेगारी त्याचप्रमाणे शहरांचा विस्तार तसेच वाढलेली लोकसंख्या तसेच पोलिसांची गरज लक्षात घेता, हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तसे पाहायला गेले तर मागील अडीच ते तीन वर्षात जवळपास 30 हजार पोलिसांची भरती झालेली आहे. राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढवण्यात आलेली आहे. जे नवीन पोलीस शिपाई आहे त्यांचे प्रशिक्षण सप्टेंबर पर्यंत संपणार आहे.

 

त्या आधी आता 1 सप्टेंबरपर्यंत सध्याची पोलीस भरती (Police Bharti 2024) पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आलेले आहेत. ही भरती तब्बल 14,471 पदांची होणार आहे. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई 8 जिल्ह्यात चालक शिपाई आणि 5 जिल्ह्यात बँडची लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे. आता उर्वरित जिल्ह्यामधील पावसाची स्थिती पाहता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

 

आजकाल शहरांचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक शिक्षण घेत नाही. वाईट प्रवृत्तीला जातात. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे वाहनांची संख्या देखील वाढलेली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस संरक्षण कमी पडत आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या विभागांमध्ये यावर्षी पोलीस भरती चालू झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -