जम्मू-काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अतिरेकी सतत सुरक्षा पथकांना लक्ष्य करतायत. डोडाच्या देसा क्षेत्रातील जंगलात सोमवारी रात्री एन्काऊंटर सुरु झालं. शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना एक अधिकारी, एक पोलीस आणि चार जवान शहीद झाले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. सुरक्षापथकांनी संपूर्ण क्षेत्राला घेराव टाकलाय. सर्च ऑपरेशन सुरु आहे. मागच्या एका आठवड्यातील काश्मीरमधील ही चौथी घटना आहे. दहशतवादी घटना वाढल्याने राजकीय पारा सुद्धा तापला आहे.
जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. “डोडा जिल्ह्यात आमच्या सैन्याचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांवर भेदरट हल्ला झाला. या घटनेने मी दु:खी आहे. आम्ही आमच्या सैनिकांच्या मृत्यूचा जरुर बदला घेऊ. दहशतवाद्यांना त्यांच्या उद्देशात कधी यशस्वी होऊ देणार नाही” असं मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.
भारतीय सैन्याच मोठ नुकसान
भारतीय सैन्याने 14 जुलैला कुपवाडा जिल्ह्यात LOC जवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्याआधी 8 जुलैला कठुआ जिल्ह्यात डोंगराळ भागात सैन्याच्या ताफ्यावर हल्ला झाला. घात लावून हा हल्ला करण्यात आला. यात भारतीय सैन्याच मोठ नुकसान झालं. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ज्यूनियर कमीशन अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले. पाच जवान जखमी झाले.
घुसून वार करण्याची वेळ आली
6 जुलैला कुलगाम जिल्ह्यात दोन एन्काऊंटर झाले. यात सुरक्षा पथकांना मोठ यश मिळालं होतं. सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पण यात दोन जवान शहीद झाले. एकूणच आठवड्याभरातील एन्काऊंटरमध्ये 11 जवानांनी आपले प्राण गमावले. तेच 9 दहशतवादी मारले गेले. काश्मीरऐवजी जम्मू भागाला दहशतवाद्यांनी टार्गेट केलय. या वाढत्या दहशतवादी कारवायांना सीमेपलीकडून म्हणजे पाकिस्तानातून खतपाणी घातल जातय. मागच्या आठ दिवसात या देशाने 9 वीर सुपूत्र गमावले आहेत. त्यामुळे या मागचा मास्टर माइंड जो आहे, तिथे घुसून वार करण्याची वेळ आलीय.