Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजनेसाठी दोन लाख अर्ज प्राप्त

लाडकी बहीण योजनेसाठी दोन लाख अर्ज प्राप्त

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत एक लाख ३३ हजार ऑफलाईन आणि सुमारे ७५ हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली.

जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केले आहे. यासाठी जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनीही विशेष व्यवस्था केली आहे. अंगणवाडी स्तरावरदेखील अर्ज भरून घेण्यात येत आहेत. शिबिरांच्या माध्यमातून अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रांविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यांनतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलैपासून दरमहा दीड हजार लाभ जमा होणार आहे. ही प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल.

रंधवे म्हणाल्या, ‘अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप अपडेट केले असून त्यात एडीटचा पर्याय उपलब्ध आहे. सर्व अंगणवाडी सेविकांनी नारी शक्ती दूत ॲप अपडेट करून घ्यावे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांची माहिती चुकीची भरली असेल, तर ती दुरुस्त करता येईल. परंतु ही दुरुस्ती एकदाच करण्याची सुविधा आहे. एकदा दुरुस्त करून बदल केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही.’

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -