Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरदोन डोस घेतलेल्यांनाच कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश

दोन डोस घेतलेल्यांनाच कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश

कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांनाही तपासून सोडले जाणार आहे. याकरिता कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कर्नाटक राज्याच्या सर्व सीमेवर आजपासून तपासणी नाके सुरू केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

‘कोविड- १९ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी आदेशाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज (दि.३०) जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माहिती दिली.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोरोना ओमायक्रॉन व्हेररियंटची घातकता लक्षात घेता मास्कचा वापर अनिवार्य आहे. ज्या व्यक्ती मास्कचा वापर करणार नाहीत त्यांच्याकडून शासनाने निर्धारित केलेला दंड वसूल केला जाईल. कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या दंडास पात्र असतील.

कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५०० रुपये इतका दंड करण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थाना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये १०,००० रुपये इतका दंड करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -