Friday, October 18, 2024
Homeराजकीय घडामोडीपवार कुटुंबियात पुन्हा वादळ, त्या प्रश्नावरुन अजित पवार- सुप्रिया सुळे समोरासमोर

पवार कुटुंबियात पुन्हा वादळ, त्या प्रश्नावरुन अजित पवार- सुप्रिया सुळे समोरासमोर

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्याचा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पवार कुटुंबियातील वादळ माध्यमांसमोर आले आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा प्रतिहल्ला चढवला आहे. शनिवारच्या या घटनेनंतर रविवारी पुन्हा दोन्ही नेते एकमेकांसमोर आले आहे.

 

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा डीपीडीसा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, शरद पवार ६० वर्षे राजकारणात आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात मंत्रिपद त्यांनी सांभाळले आहे. त्यांचा वयाचा तरी आदर राखला गेला पाहिजे होता. बैठकीत पवार साहेबांनी दोन तीन मुद्दे मांडले. त्यानंतर एक स्लाईड आली. ती पहिल्यावर पवार साहेबांनी तुम्ही निधी देताय त्याचा ब्रेकअप दिला पाहिजे, अशी सूचना केली. त्यावर जिल्हाधिकारींनी उत्तर दिले होते. ते म्हणाले, माझ्याकडे ब्रेकअपची आकडेवारी आता नाही. ती माहिती काढून मी तुम्हाला उपलब्ध करुन देतो. त्यानंतर हा विषय आमचा दृष्टिने संपला होता.

 

पण पालकमंत्र्यांनी विषय वाढवला

विषय संपल्यानंतर पुण्याचे पालकमंत्र्यांनी एक जीआर दाखवला. त्यांनी म्हटले की, पालकमंत्री आणि डीपीडीसी सदस्यांना हा अधिकार आहे. आमदार, खासदारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. तसेच तुम्हाला मागे बसवले पाहिजे आणि मागच्या लोकांना पुढे बसवले पाहिजे. मग हा नियम होता तर इतकी वर्षे का पाळला गेला नाही? हा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. कारण अजित पवार १८ वर्षे पालकमंत्री होते. अजित पवार यांच्या उत्तरानंतर शरद पवार यांनी एकही प्रश्न विचारला नाही. परंतु हा प्रोटोकॉल मी पाळणार नाही. मी प्रश्न विचारणार आहे. आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत. लोकांचे प्रश्न आम्ही विचारायचे नाही का?

 

प्रशासन म्हणते, तुम्हाला अधिकार आहेच…

जीआरमध्ये म्हटले आहे की, तुम्ही आमंत्रित असला तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. फक्त मतदानाचा अधिकार नाही. आम्ही मतदान मागत नव्हतो. फक्त प्रश्न विचारत होतो. तेव्हा आम्हाला जीआर दाखवला. त्यानंतर प्रशासनने आम्हाला सांगितले की, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु सत्ताधारींकडून ही दडपशाही आहे. हा मुद्दा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विचारणार आहे. प्रोटोकॉल सर्वांनी पाळायला हवे. फक्त तुमचे लोक आहे, त्यांना व्यासपीठावर बसवले जात आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

 

अजित पवार म्हणतात, असे काहीच झाले नाही

अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा मुद्दा खोडून काढला. डीपीडीसी बैठकीमध्ये असे काहीच झाले नाही. कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकले याचे रेकॉर्ड आहे. पण काही जण उगीच सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मी साहेबांना बोलू दिले नाही, असे म्हणत आहेत. मी साहेबांना कसा बोलू देणार नाही. उगाच एक नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. मी बोलू देत नाही, मी निधी वाटपात अन्याय करतो, असे गैरसमज पसरवले जात आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -