इचलकरंजी:
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदी इशारा पातळी जवळ पोहोचली आहे.यामुळे कोल्हापूर पूल परिसरात वरील फोटो प्रमाणे स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.
तर इचलकरंजीत आज गुरुवार दि. २५ जुलै रोजी सकाळी ०७ : ०० वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ६७.०१ फुट इतकी आहे.
इशारा पातळी – ६८ फूट धोका पातळी – ७१ फूट आहे.
दरम्यान प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



