मागच्या आठवड्यात हार्दिक पांड्याला मोठा झटका बसला. त्यांची T20 कॅप्टनशिपची संधी हुकली. रोहित शर्मानंतर T20 मधील भावी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिल जात होतं. पण हार्दिक पांड्या ऐवजी सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी निवड झाली. टीम इंडियाचा T20 मधील भावी कर्णधार सूर्यकुमार यादवच असेल. कर्णधारपदाची संधी हुकल्यानंतर आता टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याला मोलाचा सल्ला दिला आहे.
हार्दिकने शक्य तितक्या जास्तीत जास्त मॅच खेळाव्यात असं रवी शास्त्री यांचं मत आहे. हार्दिक पांड्याला कॅप्टनशिप न मिळण्यामागच मुख्य कारण त्याचा फिटनेस आहे. उपकर्णधार पदावर शुभमन गिलची निवड करुन भविष्याची दिशा सुद्धा स्पष्ट केलीय. हार्दिकने जास्तीत जास्त सामने खेळताना फिटनेसला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असा सल्ला शास्त्रींनी त्याला दिलाय.
“रवी शास्त्रींनी हार्दिकला सतत 8 ते 10 ओव्हर्स टाकण्याचा सल्ला दिलाय. त्यानंतर त्याचा नक्कीच वनडे टीममध्ये समावेश होईल” असं शास्त्री म्हणाले. “माझ्या मते मॅच फिटनेस जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे जे काही t20 क्रिकेट आहे, ते हार्दिकने जास्तीत जास्त खेळावं. तो मजबूत आणि फिट असेल, तर वनडे टीममध्ये सुद्धा त्याची निवड होऊ शकते” असं शास्त्री संजना गणेशनला म्हणाले.
हार्दिकने प्रेरणेसाठी काय करावं?
“हार्दिक पांड्याला फिटनेससाठी कुठल्याही प्रेरणेची गरज नाही. ते सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. t20 वर्ल्ड कप विजयातील त्याच प्रदर्शन हेच त्याच्यासाठी प्रेरणा आहे” असं रवी शास्त्री म्हणाले. “तो त्याच्या शरीराला इतरांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. त्यातूनच त्याला प्रेरणा मिळेल. वर्ल्ड कपमध्ये योग्यवेळी त्याने भारतासाठी चांगल प्रदर्शन केलं” असं रवी शास्त्री म्हणाले.