Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रपहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकरांचं निक्कीशी वाजलं; ‘बिग बॉस’लाही करावी लागली प्रतीक्षा

पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकरांचं निक्कीशी वाजलं; ‘बिग बॉस’लाही करावी लागली प्रतीक्षा

बिग बॉस मराठी’चा नवा सिझन सुरू झाला असून यंदा घरात 16 स्पर्धक दाखल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सदस्यांची चांगलीच चिडचिड होताना पाहायला मिळत आहे.

एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचं खरं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात पहिल्या दिवशीच ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळणार आहे.

घर म्हटलं की एकत्र नांदता नांदता भांड्याला भांड लागतंच. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही सदस्यांमध्ये ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या सोमवारच्या भागात वर्षा उसगावंकर या मेकअप करताना दिसून येत आहेत.

दरम्यान निक्की येऊन वर्षाताईंना म्हणते,”तुम्ही कृपया नंतर मेकअप करा”. त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात, “मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे. तू व्यवस्थित तयार झालीस”. पुढे निक्की वर्षाताईंना म्हणते, “लिपस्टिक नंतर लावा. आधी बाहेर येऊन बसा. लिपस्टिक कोणी नाही पाहत तसंही.”

घरातील सर्व सदस्य एकत्र जमल्यावर ‘बिग बॉस’ आदेश देणार आहेत. त्यांच्या आदेशाची सर्व सदस्य आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व सदस्य बेडरुमध्ये मेकअप करणाऱ्या वर्षांताईंना बाहेर बोलवताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -