Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेबिग बॉस मराठीमध्ये पहिल्याच दिवशी सूरज चव्हाणला सगळ्यांनी पाडलं एकटं, पाहा काय...

बिग बॉस मराठीमध्ये पहिल्याच दिवशी सूरज चव्हाणला सगळ्यांनी पाडलं एकटं, पाहा काय झालं?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरूवात झाली आहे. या सीझनमध्ये बारामतीच्या रील स्टार सूरज चव्हाणची बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून निवड झाली. सूरजची निवड सर्वांसाठी धक्कादायक होती, कारण सूरज हा काही मोठा दिग्गज कलाकार नाही. इन्स्टावर त्याचे जे रील होतात त्यावरून तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आपल्या विशेष शैलीत त्याची रील करायची पद्धत ज्यामध्ये गुलीगत धोका, बुक्कीत टिंगुळ असं काही बोलत असतो. त्यामुळे बड्या कलाकारांमध्ये त्याचा निभाव लागतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

 

बिग बॉसमध्ये पहिल्याच दिवशी सूरज चव्हाण हा एकटा पडलेला दिसला. पहिल्याच दिवशी बिग बॉसने स्पर्धकांना नाश्ता दिला नाही. नाश्ता हवा असेल तर त्यासाठी एक टास्क दिला होता. तो म्हणजे बहुमताने अशा तीन सदस्यांची निवड करायची आहे जे कोणताही निर्णय घेण्याच्या योग्यतेचे नाहीत. निर्णय घेऊ न शकणाऱ्या तीन लोकांची निवड करताना सर्वांनी सूरज चव्हाण याचं नाव घेतलं.

 

योगिता चव्हाणने सूरज चव्हाण याचं नाव घेतलं. सूरज आल्यापासून तो कोणत्याही बाबतीत फार काही मिसळला नाही. त्यामुळे तो निर्णय घ्यायला मला कमी पडू शकतो, असं मला वाटत असल्याचं योगिता म्हणाली. त्यानंतर निकी तांबोळी, घन:श्याम दरवडे, निखिल दामले, पुरुषोत्तमदादा पाटील यांनीही सूरज चव्हाणचं नाव घेतलंय.

 

दरम्यान, सूरज चव्हाणसह इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार या तीन सदस्यांची नावे घेण्यात आली. जे निर्णय घेऊ शकत नाहीत. बिग बॉसने पुढील भागात या तिघांनाही घरातील आपली किंमत वाढवण्यासाठी एक टास्क दिलाय. स्पर्धेची आता सुरूवात आहे मात्र पुढे या मोठ्या कलाकारांसमोर सूरज चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांना स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -