पाणी ओसरत चालल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा पूल हलक्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
कोल्हापूर : पावसाने धरण क्षेत्रासह जिल्ह्यात उघडीप दिल्याने पूरग्रस्त भागाला दिलासा मिळाला.
पंचगंगेची (Panchganga River) पातळी गेल्या बारा तासांत सुमारे ११ इंचांनी उतरली आहे. रात्री १२ वाजता ती ४५ फूट होती. राधानगरीचे स्वयंचलित दोन दरवाजे अद्याप खुले असून, त्यातून ४३५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणाचा धरणाचा विसर्गही घटविला असून, तो १२ हजार २८५ इतका आहे.
दुसरीकडे मात्र कोयना धरणातून अद्याप ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती आणखी काही काळ कायम राहण्याची भीती आहे. दुपारी काही काळ कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पंचगंगेचे पाणी ओसरत चालल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला बालिंगा पूल हलक्या वाहनांसाठी सायंकाळपासून खुला करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली. दुपारी काही वेळ कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात नऊ इंचाने कमी झाली. ती रात्री नऊच्या सुमारास ४५.७ फूट होती. पाणी ओसरत चालल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा पूल हलक्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर अवजड वाहनांनाची वाहतूक सुरू करण्याबाबत आज (ता. ३०) निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहरातील काही भागांत पाणी ओसरल्याने बहुतांश प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले. ४४० स्थलांतरित निवारा केंद्रांतून घरी परतले. अद्याप जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण असे एकूण ९७ मार्ग बंद आहेत, तर ८१ बंधारे पाण्याखाली आहेत. सध्या आलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग अद्याप ३२ हजार १०० क्युसेक आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत.
धरणसाठा (टीएमसीमध्ये)
धरण क्षमता (टीएमसी) पाणीसाठा टक्केवारी विसर्ग (क्युसेकमध्ये)
दूधगंगा २५.३९३* २१.६४*८५.२३*८१००
तुळशी ३.४७* ३.२५*९३.५९* १५००
कासारी २.७७४*२.२४*८०.८५*१०७०
कडवी २.५१६*२.५२*१००* ७१०
कुंभी २.७१५*२.२५*८२.७०*३००
पाटगाव ३.७१६*३.६६*९८.५३*२००
चिकोत्रा १.५२२*१.३१*८५.८६*–
चित्री १.८८६*१.८९*१००*११७३
जंगमहट्टी १.२२३*१.२२*१००*६३५
घटप्रभा १.५६०*१.५६*१००*४७६५
जांबरे ०.८२०*०.८२*१००*१४८७
आंबेओहोळ १.२४०*१.२४*१००*२२०
सर्फनाला ०.६७० *०.४८*७१.०६*७१४
पूरस्थितीतून
वारणा धरणातील विसर्ग घटविला
राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले
जिल्ह्यातील ९७ मार्ग बंद, ८१ बंधारे पाण्याखाली
काही काळ सूर्यदर्शन
शहरातील ४४० स्थलांतरित घरी परतले
शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहतूक सुरू
धरण क्षमता (टीएमसी) पाणीसाठा टक्केवारी विसर्ग (क्युसेक)
राधानगरी ८.३६ ८.२३ ९८.४३ ४,३५६
वारणा ३४.३९ २९.२८ ८५.१३ १२,२८५
आलमट्टी १२३.८ ६७.८५ ५५.१३ ३,००,०००
कोयना १०५.३ ८४.८५ ८० ३२,०००