Wednesday, October 30, 2024
Homeक्रीडारोहित शर्मा मोठ्या अडचणीत, गंभीर आरोपाने खळबळ; नेमकं काय घडलं?

रोहित शर्मा मोठ्या अडचणीत, गंभीर आरोपाने खळबळ; नेमकं काय घडलं?

भारतीय क्रिकेट संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा सध्या बऱ्याच चर्चेत आहे. टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित आणि भारतीय संघाचे बरेच कौतुक झाले. त्यानंतर तो कुटुंबासह सुट्टीवर गेला होता. आता मात्र रोहित शर्मा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याच्यावर फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप कितपत खरे आहेत याची सध्या पुष्टी होऊ शकलेली नाही. पण, रोहित शर्माने फोटोशी छेडछाड केल्यामुळे सोशल मीडियावर मात्र बराच गदारोळ माजला आहे.

 

 

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये T20 सीरिज जिंकल्यानंतरच रोहितवर हा आरोप करण्यात आला आहे. याचदरम्यान रोहितने मात्र या विजयासाठी सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.

 

 

रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा

 

टी-20 मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून अभिनंदन केले . परफेक्ट स्टार्ट, वेल डन टीम, असे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले.

 

 

कोणत्या फोटोमुळे रोहितवर आरोप ?

 

पण रोहितवर नेमका आरोप कशामुळे झालाय, कोणत्या फोटोमुळे गदारोळ झालाय असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. तर तो फोटो खुद्द रोहित याचाच आहे. या फोटोशी छेडछाड करून त्यात बदल करण्यात आल्याचा आरोप रोहितवर लावण्यात आला आहे. हा फोटो सध्या बराच व्हायरल झाला असून, नेमकं काय झालंय ते त्याद्वारेच स्पष्ट होतंय.

 

रोहितने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तो निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतोय, त्यात त्याचं पोट दिसत नाहीये. पण BCCI ने असाच फोटो शेअर केला असून त्यामध्ये तर रोहितचं पोट ( थोडं बाहेर आलेलं) दिसत आहे. त्यामुळे रोहितने स्लिम दिसण्यासाठी (त्याने शेअर केलेल्या फोटोत) बदल केला असल्याचं म्हटलं जात आहे.

 

रोहितच्या चाहत्यांचं म्हणणं काय ?

 

सध्या या फोटोच्या सतत्येबाबत पुष्टी करत येत नाहीये, मात्र एक गोष्ट खरी आहे की अशा कोणत्याही फोटोंमुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना काहीच फरक पडत नाही. ‘तो आमचा चँपियन कर्णधार आहे’ असं त्याच्या चाहत्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. फिट असो किंवा नसो, तो गोलंदाजांची बरोबर धुलाई करतो ना, असेही एकाने कमेंटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवची विजयी घोडदौड सुरू ठेवण्याचे आव्हान आता रोहित शर्मासमोर आहे. श्रीलंकेत वनडे मालिका जिंकण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. आणि, यासाठी, तो पूर्णपणे तयार असल्याचेही दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -