कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावला आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईकर गणेशोत्सवात गावी जात असल्यामुळे त्यांच्यासाठी 258 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वेंमुळे त्याचा प्रवास सुखकारक होणार आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाला पत्र दिले होते.
गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी मुंबईत राहणारे हजारो जण गावी जात असतात. त्यामुळे त्या काळातील रेल्वे आरक्षण यापूर्वीच फुल्ल झाले आहे. मग जास्त पैसे मोजून चाकरमान्यांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने कोकणवासींना आनंद देणारा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रवास सुखकारक होणार आहे. गणेशोत्सव काळात मध्य रेल्वे 202 विशेष गाड्या चालवणार आहे तर पश्चिम रेल्वे कडून 56 गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती मागणी बघता मध्य रेल्वे आणखी 50 गाड्या सोडण्याची शक्यता आहे
अशा असतील विशेष रेल्वे
मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी डेली स्पेशल (01151 ) या रेल्वेच्या 36 फेऱ्या होणार आहेत. ही रेल्वे 1 ते 18 सप्टेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणार आहे. रात्री 00:20 वाजता ही गाडी सुटेल आणि 14:20 वाजता सावंतवाडी येथे पोहोचणार आहे. परत येताना ही गाडी (01152) सावंतवाडी येथून दुपारी 15.10 वाजता सुटणार आहे. मुंबईत पहाटे 4.35 ला पोहचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावड, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकावर थांबे दिले आहेत.
मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी डेली स्पेशल या रेल्वेच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत. 01153 ही गाडी 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 20:10 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तसेच 01154 स्पेशल रत्नागिरीवरून दररोज पहाटे 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावडाव, आरवली रोड, संगमेश्वर रोड येथे थांबे दिले आहेत.
एलटीटी – कुडाळ डेली स्पेशल गाडीच्या (०११६७)३६ फेऱ्या होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १ ते १८ सप्टेंबर दरम्यान ही ट्रेन रात्री २१:०० वाजता सुटेल. सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहचणार आहे. तसेच ०११६८ स्पेशल कुडाळवरून दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीस ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग येथे पोहचणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ ते १८ सप्टेंबर दरम्यान ०११७१ स्पेशल एलटीटी मुंबई येथून गाडी सुटणार आहे. दररोज सकाळी ०८:२० वाजता ही गाडी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी येथे पोहचणार आहे. ०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून दररोज रात्री २२:२० वाजता सुटेल आणि सकाळी १०:४० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर थांबे दिले आहेत.
दिवा चिपळूण मेमू स्पेशल (०११५५) मेमू गाडी १ ते १८ सप्टेंबर दरम्यान दिवा येथून दररोज सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. त्यानंतर परत येताना (०११५६) मेमू स्पेशल चिपळूणवरून दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाडीला दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गारगाव, वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी येथे थांबे असणार आहे.
एलटीटी – कुडाळ स्पेशल (०११८५) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २ ते १८ सप्टेंबर दरम्यान सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणार आहे. ही गाडी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. परत येताना (०११८६) स्पेशल कुडाळवरून सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग थांबे दिले आहेत.
एलटीटी कुडाळ स्पेशल(०११६५) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ३ ते १८ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. परत येताना (०११६६) स्पेशल कुडाळवरून दर मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग थांबे दिले आहेत.