Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीमनोहर जोशी यांना ‘एस. सी. शर्मा गोल्ड मेडल’ प्रदान

मनोहर जोशी यांना ‘एस. सी. शर्मा गोल्ड मेडल’ प्रदान

इचलकरंजी – हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर गोपाळ जोशी यांना दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेकडून साखर निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये संशोधनात्मक उपक्रम राबविल्याबद्दल ‘एस.सी.शर्मा गोल्ड मेडल’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. जयपूर (राजस्थान) येथे संपन्न राष्ट्रीय पातळीवरील या संस्थेची 82 वी वार्षिक परिषद व आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया नवीदिल्लीचे प्रेसिडेंट संजय अवस्थी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी निराणी ग्रुपचे संगमेश आर. निराणी, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे अ‍ॅॅडव्हायझर शिवाजीराव देशमुख, डायरेक्टर जनरल संभाजीराव कडूपाटील, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर डॉ. सीमा परोहा, आयआयएसटी लखनौ या संस्थेचे डायरेक्टर आर. विश्‍वनाथन आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मनोहर जोशी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रमा जोशी यांनी स्विकारला.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मनोहर जोशी यांना लाभले. यापूर्वी मनोहर जोशी यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, दैनिक महानकार्य आणि श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक हुपरी तसेच ब्राम्हण सभा, इचलकरंजी या संस्थांकडून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -