Monday, September 16, 2024
Homeबिजनेसभारीच की!! मुलांना दप्तराचं ओझं शाळेत नेण्याची गरज नाही; असं आहे NEP...

भारीच की!! मुलांना दप्तराचं ओझं शाळेत नेण्याची गरज नाही; असं आहे NEP चं नवं धोरण

शालेय विद्यार्थ्यांच्या जडण घडणीसाठी (Bagless Day in School) शालेय शिक्षण विभाग वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असते. या धर्तीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी ‘बॅगलेस डे’ लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या माध्यमातून विद्यार्थी दहा दिवस शाळेत दप्तराविना येतील आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि हाताने शिकण्याच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित करतील; असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग आहे.

 

बॅगलेस दिवस (Bagless Day in School)

विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासह व्यावहारिक कौशल्ये शिकता यावीत यासाठी शैक्षणिक धोरणात दहा दिवसांच्या बॅगलेस कालावधीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार इयत्ता 6 वी ते 8 वीमधील सर्व विद्यार्थ्यांना 10 दिवसांच्या बॅगलेस उपक्रमात सहभागी होता येणार आहे. हा उपक्रम नियमित शैक्षणिक प्रक्रियेचा भाग म्हणून साजरा केला जाणार आहे. यामधून विद्यार्थी स्थानिक व्यावसायिकांसोबत कामाचा अनुभव घेतील. तसेच विद्यार्थ्यांना विविध हस्तकलांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे.

 

विद्यार्थ्यांना ‘या’ गोष्टी शिकता येणार

बॅगलेस उपक्रमांतर्गत 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्याला छोटेखानी कोर्सला प्रवेश घ्यावा लागेल. त्यानुसार सुतारकाम, इलेक्ट्रिक वर्क, मेटल वर्क, बागकाम, मातीची भांडी बनविणे अशा व्यावसायिक हस्तकलेच्या नमुन्याचे सर्वेक्षण विद्यार्थ्याला करता येईल. यासोबत विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळणार आहे. तसेच भाजी मंडईला भेट देऊन पाहणी करणे, धर्मादाय संस्थांना भेटी देणे, पाळीव प्राण्यांच्या (Bagless Day in School) काळजीवर सर्वेक्षण आणि अहवाललेखन, पतंग बनविणे आणि उडविणे, पुस्तक मेळा आयोजित करणे, वटवृक्षाखाली बसणे, बायोगॅस संयंत्र आणि सौरऊर्जा पार्कला भेट देणे अशा पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. ‘बॅगलेस’ दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासेतर उपक्रम शिकण्यास चांगला वाव मिळणार आहे ; त्यामुळे या उपक्रमाचे विद्यार्थी आणि पालकांमधून स्वागत होईल हे निश्चित.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -