Saturday, December 21, 2024
Homeसांगलीसांगली: नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

सांगली: नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

भारतीय हवामान खात्याव्दारे सातारा जिल्ह्याकरिता रेड व आँरेज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे 2 ते 3 फुट वाढ होण्याची शक्यता आहे. मुक्तपाणलोट क्षेत्रातील पाऊस व धरणातील विसर्गवाढीमुळे पाणीपातळी मध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग क्युसेक्समध्ये

 

कोयना धरणामधून 52 हजार 100

 

धोम धरणातून 7 हजार 856

 

कन्हेर धरणातून 4 हजार 844

 

धोम बलकवडी धरणातून 1 हजार 415

 

उरमोडी धरणातून 2 हजार 973

 

तारळी धरणातून 4 हजार 960

 

वारणा धरणातून 11 हजार 532

 

वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -