सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आता याच याचिकांवर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या ६ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची तारीख एकाच दिवशी दर्शवण्यात आली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोर्टाला विनंती केली आहे.
पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. “शिवसैनिक वकील आहे. जनता न्यायाधीश आहे. तिथे तुमची बाजू मांडा. जनतेच्या न्यायालयातील सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे जनता आपला निकाल देईल. विश्वास आहे. कोर्टाला विनंती केली आहे. आम्ही आता शेवटची विनंती करतो. नाही तर आम्ही नाद सोडतो”, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.