Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रसज्ज व्हा! शिवसेनेचा वाघ परत येतोय… ‘धर्मवीर 2’ची नवीन रिलीज डेट जाहीर

सज्ज व्हा! शिवसेनेचा वाघ परत येतोय… ‘धर्मवीर 2’ची नवीन रिलीज डेट जाहीर

गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण(movie) झाली होती. काही गाव पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून ‘धर्मवीर – 2’ ह्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकही करण्यात आले होते.

 

सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून(movie) अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या 27 सप्टेंबरला ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली.

 

प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती ,अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते ,परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती, सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार ? याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ २७ सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. ‘धर्मवीर – 2’ हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -