Saturday, December 21, 2024
Homeदेश विदेशभारताचा पॅरिस ऑलिम्पिकमधील आठवा दिवस पदकाविनाच, मनुची हॅटट्रिक हुकली, 4 ऑगस्टचं वेळापत्रक...

भारताचा पॅरिस ऑलिम्पिकमधील आठवा दिवस पदकाविनाच, मनुची हॅटट्रिक हुकली, 4 ऑगस्टचं वेळापत्रक जाणून घ्या

भारताला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आठव्या दिवशी पदकांची अपेक्षा होती. मात्र भारतीय खेळाडूंना मेडल जिंकण्यात अपयश आलं. परिणामी भारताला एकही पदकं मिळालं नाही.

 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंना पदक मिळवण्याची संधी होती. मात्र भारतीय खेळाडू पदकं मिळवण्यात अपयशी ठरले. नेमबाजीत मनु भाकरची पदकाच्या हॅटट्रिकची संधी हुकली. तिरंदाजीत दीपिका कुमारी पराभूत झाली. तसेच इतर खेळाडूंनीही निराशा केली. त्यामुळे आठ दिवसांनंतरही भारताच्या पदकांची संख्या ही 3 अशीच आहे.

 

भारतीय खेळाडू आठव्या दिवशी अपयशी, पदकाची संधी हुकली, 4 ऑगस्टचं वेळापत्रक पाहा

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंना पदक मिळवण्याची संधी होती. मात्र भारतीय खेळाडू पदकं मिळवण्यात अपयशी ठरले. नेमबाजीत मनु भाकरची पदकाच्या हॅटट्रिकची संधी हुकली. तिरंदाजीत दीपिका कुमारी पराभूत झाली. तसेच इतर खेळाडूंनीही निराशा केली. त्यामुळे आठ दिवसांनंतरही भारताच्या पदकांची संख्या ही 3 अशीच आहे. आता हॉकी टीम इंडियाचा 4 ऑगस्ट रोजी उपांत्यपूर्व फेरीतील सामना ग्रेट ब्रिटेन विरुद्ध होणार आहे. जाणून घ्या भारताचं दिवसभरातलं वेळापत्रक.

 

टीम इंडियाचं 4 ऑगस्टचं वेळापत्रक

 

निशांत देवचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव

निशांत देव याचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पराभव झाला आहे. निशांतचं पराभवासह आव्हान संपुष्टात आलं आहे. मेक्सिकन बॉक्सर मार्को वर्देने त्याचा 4-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

 

भारताचं तिरंदाजातील आव्हान संपुष्टात

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताचं तिरंदाजातील आव्हान संपुष्टात आलं आहे. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ सहभागी झाले होते. त्यामुळे भारताला पहिल्यावहिल्या पदकाची आशा होती. मात्र भारतीय तिरंदाजांना अचून नेम लगावण्यात अपयश आलं.

 

अनंतजीत 30 नेमबाजांमधून 24 व्या स्थानी

भारतीय नेमबाज अनंतजीत स्कीट शूटिंग स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अनंतजितची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. परिणामी तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. अनंतजीत 30 नेमबाजांमधून 24 व्या स्थानावर राहिला.

 

तिरंदाज दीपिका कुमारी रोमांचक सामन्यात क्वार्टर फायनलमध्ये पराभूत

भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारीचा उपांत्यपूर्व सामन्यात पराभव झाला आहे. कोरियाच्या महिला तिरंदाजाने दीपिकाचा पराभव केला आहे. दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दीपिकाने पहिला सेट 28-26 असा जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये 25-28 असा पराभव झाला. त्यामुळे सामन्यात 2-2 अशी बरोबरी झाली. त्यानंतर दीपिकाने तिसऱ्या सेटमध्ये कमबॅक केलं. दीपिकाने तिसरा सेट 29-28 असा जिंकला. यासह तिने 4-2 अशी आघाडी घेतली. मात्र दीपीकाने चौथा सेट 27-29 ने गमावला आणि पुन्हा एकदा सामना 4-4 असा बरोबरीत सुटला.

 

टीम इंडिया-कोरिया बरोबरीत, तिरंदाजी क्वार्टर फायनल सामना रंगतदार स्थितीत

भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारी हीने तिसऱ्या सेट जिंकला आहे. दीपिकाने 29-28 फरकाने सेट आपल्या नावावर केला आहे. दीपीकाने यासह 4-2 अशी आघाडी घेतली आहे. त्याआधी दीपीकाला दुसऱ्या सेटमध्ये पराभूत व्हावं लागलं. तर दीपीकाने पहिला सेट जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. दीपीकासमोर कोरियाचं आव्हान आहे

 

पात्रतेसाठी अजून 3 फेऱ्या बाकी, एक फेरी आज, तर 4 ऑगस्टला दोन फेऱ्या

महिला नेमबाजी स्कीट स्पर्धेत भारताकडून रायजा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान सहभागी होत आहेत. दोन फेऱ्यांनंतर माहेश्वरी 14व्या तर राइझा 27व्या क्रमांकावर आहेत. पात्रतेसाठी अजून 3 फेऱ्या बाकी असून त्यात एक फेरी आज होणार असून उद्या (4 ऑगस्ट) दोन फेऱ्या होणार आहेत.

 

भजन कौर प्री-क्वार्टर फायनलमधून बाहेर

भारताला मोठा धक्का लागला आहे. भजन कौर प्री-क्वार्टर फायनलमधून बाहेर पडली आहे. तिला इंडोनेशियाच्या डायंडा चोरुनिसाने पराभूत केलं आहे. दोन्ही खेळाडूंचा पाचव्या सेटनंतर स्कोअर हा 5-5 ने बरोबरीत होता. मात्र भजन कौर हीचा शूटऑफमध्ये पराभव झाला

 

दीपिकाचा उपांत्य फेरीतील सामना केव्हा आणि किती वाजता?

दीपिका कुमारी हीचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना आज 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. दीपीकाच्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी सुरु होणार आहे. दीपाकाचा या सामन्यात विजयी होऊन पुढील फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.

 

दीपिका कुमारीने सामना जिंकला

दीपिका कुमारीने प्री-क्वार्टर फायनलमध्ये विजय मिळवला आहे. दीपिकाने जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनचा पराभव केला आहे. दीपिकाने हा सामना 6-3 अशा फरकाने जिंकला आहे. दीपिकाने यासह उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

 

पॅरिस ऑलिम्पिकचा आठवा दिवस

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आठव्या दिवशी भारताचे 11 खेळाडू एकूण 6 खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यापैकी भारताचे काही सामने झाले आहेत. भारताला आतापर्यंत 3 पदकं मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे भारताला नेमबाज मनु भाकरकडून तिसऱ्या पदकाची आशा होती. मात्र मनूला त्यात अपयश आलं. आता भारताला पदक मिळवून देण्याची जबाबदारी ही दीपीका कुमारी आणि इतर खेळाडूंवर असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -