Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगEPFO मधील 7 कोटी खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, PF खात्यासंदर्भात बदलला हा नियम

EPFO मधील 7 कोटी खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, PF खात्यासंदर्भात बदलला हा नियम

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यासंदर्भात नवीन नियम केला आहे. हा बदल सर्व पीएफ खातेदारांसाठी लागू होणार आहे. ईपीएफओचे देशभरात 7 कोटी खातेधारक आहेत. ईपीएफओने पीएफ खातेधाराकांसाठी त्यांची माहिती अपडेट करण्यासंदर्भात काही नियम केले आहेत.

 

ईपीएफओकडून गाइडलाइन

EPFO ने वैयक्तीक माहिती नाव, जन्म तारखेत सुधारणा करण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती (SOP) तयार केली आहे. यामुळे पीएफधारकांना त्यांचे प्रोफाइल अपडेट करण्यासाठी एसओपी व्हर्जन 3.0 चा वापर करावा लागणार आहे. त्याला मंजुरी दिली गेली आहे. या नवीन नियमानंतर UAN प्रोफाइलमध्ये अपडेट किंवा बदल करण्यासाठी आता कागदपत्रे द्यावी लागणार आहे. ईपीएफओने आपल्या गाइडलाइनमध्ये म्हटले आहे की, खातेधारकांच्या प्रोफाईलमध्ये अनेक वेळा काही चुका असतात. त्यात दुरुस्त करण्यासाठी त्यांना अनेक दिव्य पार पाडावे लागतात. या अडचणी डेटा अपडेट न झाल्यामुळे होते. त्यामुळे आता गाइडलाइन जारी केली आहे.

 

लहान बदलांसाठी असे करा

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, EPFO ने प्रोफाइलमधील बदलण्यासाठी दोन श्रेणी केल्या आहे. किरकोळ बदल एका अर्जासह दोन आवश्यक कागदपत्रे दिल्यावर करता येणा आहे. तर मोठे बदल करण्यासाठी किमान तीन आवश्यक कागदपत्रे लागतील. यामध्ये क्षेत्रीय कार्यालयांना सदस्यांचे प्रोफाइल अपडेट करताना अधिक काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

 

मोठ्या बदलांसाठी तीन कागदपत्रे

मोठ्या बदलांसाठी, किमान तीन आवश्यक कागदपत्रे प्रदान करावी लागतील. आधारशी संबंधित बदलांच्या बाबतीत, आधार कार्ड किंवा सक्रिय मोबाइल नंबरशी लिंक केलेले ई-आधार कार्ड सहाय्यक दस्तऐवज म्हणून पुरेसे असेल. हे बदल वर्तमान नियुक्ताच्या खात्यातच होऊ शकतात. जुन्या नियुक्तीधारकाच्या खात्यात बदल होणार नाही.

 

कोणत्या बदलासाठी किती कागदपत्रे?

किरकोळ बदलांसाठी, दस्तऐवजांच्या सूचीमधून किमान दोन दस्तऐवज आवश्यक आहेत.

मोठ्या बदलांसाठी, दस्तऐवजांच्या सूचीमधून किमान तीन कागदपत्रे आवश्यक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -