ताजी बातमी/ऑनलाइन टीम
आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी इचलकरंजीतील काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची बातमी कळताच संपूर्ण वस्त्र नगरीतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्री राजू बाबुराव आवळे असे त्यांचे नाव असून हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे. ते इचलकरंजी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी इचलकरंजी पालिकेच्या शिक्षण सभापतीपदी अतिशय उत्कृष्ट काम केले होते.
याशिवाय काँग्रेसच्या प्रत्येक कार्यात ते सहभागी असायचे. समोरच्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्याला समजावून सांगणे यामुळे ते सर्वांच्या चांगल्या परिचयाचे होते. त्यांचा नेहमीच सामाजिक कार्यात मोठा वाटा असायचा.
दरम्यान आज रविवारी सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच इचलकरंजी व परिसरातून राजकीय तसेच सर्वच क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.