Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेश्रावणात उपवासात साबुदाणा खावा की नाही?

श्रावणात उपवासात साबुदाणा खावा की नाही?

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्व आहे, या महिन्यात अनेक जण उपवास करतात. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

श्रावण महिन्यात लोक उपवास ठेवला की साबुदाणा खिचडीही खातात.

पण असे करणे योग्य की अयोग्य? याबद्दल आपण आज जाणून घेणारोत.

श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. या काळात महादेवाची पूजा केली जाते आणि त्यांच्यासाठी उपवास केला जातो.

उपवासाला साबुदाणा खाणे

हिंदू धर्मात उपवासाला महत्त्व दिले जाते. या काळात फळे, दही, फळे इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. ज्यामध्ये साबुदाण्याचा देखील समावेश आहे.

साबुदाण्याचे गुणधर्म

बहुतेक लोक उपवासात साबुदाणा खातात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते.

ऊर्जा मिळवा

 

उपवासात साबुदाणा खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. तसेच ते खाल्ल्याने उपवासही मोडत नाही. या कारणास्तव ते उपवासला साबुदाणा खाल्ला जातो.

श्रावणाच्या उपवासात साबुदाणा खाताय?

 

श्रावण महिन्यातील उपवासात साबुदाणा खाऊ शकतो. हा एक अतिशय आरोग्यदायी आणि चांगला पर्याय आहे. यापासून बनवलेली खिचडी खाल्ल्याने भूक लागत नाही.

 

पण साबुदाणा का खाऊ नये

 

मात्र, काही लोकांना उपवासात साबुदाणा खायला आवडत नाही. याचे कारण साबुदाण्याच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये असू शकते. साबुदाणा हा पाम वनस्पतीचे खोड आणि मुळापासून बनवला जातो.

 

मग उपवासात काय खावे

 

जर तुम्ही श्रावणाचा उपवास करत असाल तर या काळात तुम्ही फळे, दूध, दही, बटाटे, ताक, काकडी इत्यादी पदार्थ खाऊ शकता. याशिवाय सुका मेवाही खाऊ शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -