ताजी बातमी /ऑनलाइन टीम
ताराराणी पक्षाच्यावतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे आणि ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभ तसेच महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन देशभरात साजरा केला जातो. येथील पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणात स्मृती स्तंभ असून त्या स्तंभास क्रांती दिनी ताराराणी पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सतिश मुळीक, महावीर कुरुंदवाडे, शेखर शहा, श्रीरंग खवरे, दीपक सुर्वे, बाबासाहेब पाटील, नरसिंह पारीक, चंद्रकांत पाटील, श्रीकांत टेके, राहुल घाट, पांडुरंग सोलगे, शैलेश गोरे, संजय केंगार, शिवाजी काळे, सर्जेराव पाटील, मोहन काळे, चंद्रकांत इंगवले, अशोक पुजारी, भारत बोंगार्डे, मुरारजी देसाई, सुभाष जाधव, किशोर पाटील, संजय आरेकर, बंडोपंत लाड, राजेंद्र बचाटे, राजू माळी, रमेश पाटील, अनिल शिकलगार, अरुण निंबाळकर, सर्जेराव हळदकर, नजमा शेख, सीमा कमते, सपना भिसे, अनिल बमण्णावर, राजू पुजारी, राजू दरीबे आदींसह आवाडे समर्थक, ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.