Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्र“लाडकी बहीणपाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ योजना आणा अन् शेतकऱ्याला…”, भाजप पुरस्कृत आमदाराची...

“लाडकी बहीणपाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ योजना आणा अन् शेतकऱ्याला…”, भाजप पुरस्कृत आमदाराची मुख्यमंत्र्यांना साद

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना खूश करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये मिळणार आहेत. त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.

 

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्याचप्रमाणे लाडका शेतकरी भाऊ अशी योजना आणावी आणि या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना राजेंद्र राऊत यांनी ही मागणी केली आहे.

 

राजेंद्र राऊत काय म्हणाले?

“राज्य सरकारने लाडकी बहीण, बेरोजगारांना रोजगाराची संधी असे अनेक चांगले निर्णय घेतले आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने लाडकी बहीण पाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ ही योजना सुरु करावी. या योजनेतंर्गत सर्व शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी व्हावी, अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे. या भावनेची कदर करुन निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्ही तिन्ही गटाचे आमदार एकत्रित पत्र देणार आहोत. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व्हावी आणि त्यांचा साताबारा सरसकट कोरा व्हावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत”, असे बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटले.

 

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेतंर्गत महिलांना १५०० दर महिना दिले जाणार आहे. त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरु केली आहे. त्याद्वारे बारावी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10 हजार रुपये मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -