Thursday, September 19, 2024
Homeअध्यात्मरक्षाबंधन १८ की १९ ऑगस्टला? नक्की तारीख काय? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त...

रक्षाबंधन १८ की १९ ऑगस्टला? नक्की तारीख काय? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? घ्या जाणून…

रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरवीत त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करते. यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या संरक्षणाची हमी देतो. पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते; पण काळानुसार आता सणाच्या संकल्पनाही बदलल्या. आता बहिणीदेखील भावाच्या कठीण काळात त्याची साथ देतात. त्याच्या पाठीशी उभ्या राहतात.

 

हिंदू दिनदर्शिकेनुसार, भावा-बहिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र, यंदा रक्षाबंधन १८ तारखेला की १९ ऑगस्टला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची यंदाची नेमकी तारीख काय आहे? या दिवशी भावाला राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त कोणते? आणि भद्रकाल नेमका किती तास असेल? याबाबत जाणून घेऊ…

 

रक्षाबंधन कधी आहे?

 

पंचांगानुसार, पौर्णिमा १९ ऑगस्ट रोजी पहाटे ०३ वाजून ०४ मिनिटांपासून सुरू होईल; जी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे यंदा रक्षाबंधन सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.

 

राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त

 

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री ०९ वाजून ०८ मिनिटांपर्यंत राहील. त्याशिवाय प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी ६.५७ ते रात्री ०९.१० या वेळेत राखी बांधणे शुभ राहील.

 

भद्रकाळ नेमका किती तास

 

पंचांगानुसार, रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ पाळला जातो. कारण- तो अशुभ मानला जातो. त्यामुळे या अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही. पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे ५.५३ वाजता भद्रकाळ सुरू होईल आणि तो दुपारी १.३२ पर्यंत राहील.

 

भद्रकाळात राखी का बांधू नये?

पौराणिक कथेनुसार, भद्रकाळात लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाच्या हातून रावणाचा वध झाला होता. त्यामुळे भद्रकाळात राखी बांधली जात नाही.

 

राखी बांधताना म्हणावा ‘हा’ मंत्र

 

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।

 

यंदा तुम्हीही तुमच्या सर्व भावंडांसह रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करा. तुमच्या बहीण-भावातील नाते, प्रेम कायम टिकून राहावे यासाठी रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना आजपासूनच खूप खूप शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -