Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र५ कोटींच्या शेअर बाजार फसवणुकीचे प्रकरण; मुख्य आरोपीला बंगळूरहून अटक

५ कोटींच्या शेअर बाजार फसवणुकीचे प्रकरण; मुख्य आरोपीला बंगळूरहून अटक

दापोली तालुक्यात शेअर बाजारात(stock market)गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मुख्य आरोपी हर्ष काताळकर याला बंगळूर (कर्नाटक) येथून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घडामोडींमुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.

 

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगाधर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास करून हर्ष काताळकरला पकडले. आरोपीने दापोलीतील १७ गुंतवणूकदारांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून एकूण ५ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणातील इतर आरोपींची चौकशी सुरु असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -